ISIS प्रकरणात NIAची मोठी कारवाई, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून एकाला अटक
शमील साकिब नाचन याला ठाण्याच्या पडघामधून अटक केली आहे. दहशतवादी कृत्यांसाठी इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (IED)बनवण्याच प्रशिक्षण घेणे आणि चाचणी करण्याच्या आरोपाखाली शमील साकिबला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
इसिसच्या महाराष्ट्र मॉड्युलशी (isis module case) संबंधित आरोपाखाली सध्या अटक सत्र सुरु आहे. या प्रकरणात आता राष्ट्रीय तपास संस्था (NIA)ला मोठं यश आले आहे. दहशतवादाच्या संबंधित आरोपाखाली राष्ट्रीय तपास संस्थेने आता सहावी अटक केली आहे. शमील साकिब नाचन याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातून अटक केली आहे. दहशतवादी कृत्यांसाठी इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (IED)बनवण्याच प्रशिक्षण घेणे आणि चाचणी करण्याच्या आरोपाखाली शमील साकिब नाचन (Shamil Nachan) अटक झाली आहे.
कोण आहे शमील साकिब नाचन?
शमील (Shamil Nachan) हा साकिब नाचनचा मुलगा आहे आणि तो ठाणे जिल्ह्यातील पडघा येथील रहिवासी आहे.साकिब नाचन हा 2002 आणि 2003 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये दोषी ठरवण्यात आलं होतं. तर आता साकिबचा मुलगा शमीलला दहशतवादी कृत्यांसाठी इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (IED)बनवण्याच प्रशिक्षण घेणे आणि चाचणी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
जुल्फीकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, सिमाब नसीरूद्दीन काझी आणि अब्दुल कादिर पठाण या आरोपींच्या सहकार्याने शमील साकिब नाचन काम करत होता. यामधील मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी हे सुफा दहशवादी टोळीचे सदस्य आहेत. या दोघांना अद्याप अटक झाली नसून ते फरार आहेत. एप्रिल 2022 मध्ये राजस्थानमधील कारमधून स्फोटके जप्त केल्याच्या प्रकरणात त्यांना मोस्ट वॉन्टेड घोषित करण्यात आले होते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
शमीलसह इसिस मॉड्युलचे हे सदस्य पुण्यातील कोंढवा येथील घरातून कार्यरत होते. जिथे त्यांनी आयईडी एकत्र केले होते. तसेच गेल्यावर्षी बॉम्ब प्रशिक्षण आणि कार्यशाळेतही त्याने भाग घेतला होता.
हे ही वाचा : Nitin Gadkari: ‘पुण्यात हवेतून चालणाऱ्या बसेस आणणार’, गडकरींनी दादांना सांगितलं; बघून घ्या!
दरम्यान याआधी इसिस महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात एनआयएने एका डॉक्टरला अटक केली होती. पुण्यातील कोंढवा भागातून ही अटक करण्यात आली असून, डॉ. अदनानली सरकार (वय 43) असे या व्यक्तीचे नाव आहे. एनआयएकडून करण्यात आलेल्या कारवाईतील ही पाचवी अटक आहे.समोर आलेल्या माहितीनुसार अदनानली सरकार याच्या घरात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि इसिसशी संबंधित काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. डॉ. सरकार हा तरुणांची मनं वळवून या संघटनेसाठी भरती करत असल्याचे या कागदपत्रांतून आढळून आल्याचा दावा एनआयएने केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाबाबत ठाकरे गटाने केली मोठी मागणी, थेट…
ADVERTISEMENT