Raj Kundra Case : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला ईडीचं समन्स, 15 ठिकाणी छापेमारीनंतर...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज कुंद्राला ईडीचं समन्स

point

ईडीची दोन दिवसांपूर्वी 15 ठिकाणी छापेमारी

Raj Kundra Case : अश्लील चित्रफिती आणि मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना समन्स बजावलं आहे. राज कुंद्राला या आठवड्यात तपास यंत्रणांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. ईडीने राज कुंद्रा आणि अन्य काही लोकांच्या घरी मुंबई आणि उत्तर प्रदेशमधील काही ठिकाणी सुमारे 15 ठिकाणी छापे टाकल्यानंतर हे समन्स जारी करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Maharashtra New CM: मोठी बातमी! भाजपकडून थेट शपथविधीची तारीख जाहीर, पण मुख्यमंत्री...

ईडीने या प्रकरणाशी संबंधित इतर लोकांनाही समन्स बजावलं असून, त्यांना चौकशीसाठी मुंबईतील कार्यालयात बोलावलं आहे. राज कुंद्रा यांना सोमवारी सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात येण्यास सांगण्यात आलं आहे. राज कुंद्राचे वकील प्रशांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, आमच्या अशिलाने कोणताही गुन्हा केलेला नाही. ते  पुढे  म्हणाले, मुंबई पोलिसांची चार्जशीट पाहिल्यास लक्षात येतं की, राज कुंद्राचे सर्व व्यवहार कायदेशीर आहेत. त्याने कर भरलेला आहे. राज कुंद्राने मनी लाँड्रिंगसारखा कोणताही गुन्हा केलेला नाही, याची मी खात्री देतो असं त्यांचे वकिल म्हणाले आहेत.

हे ही वाचा >> LPG Price Hike : एलपीजी गॅसच्या किमती पुन्हा वाढल्या, दोन महिन्यात 60 रुपयांपेक्षा जास्त वाढ, वाचा आकडे

दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला ईडीने क्रिप्टो करन्सी प्रकरणात राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची ९८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. मात्र, त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून त्यांच्या मालमत्ता जप्तीच्या विरोधात दिलासा मिळाला आहे. राज कुंद्रा आणि त्यांची कंपनी या फिल्म्सद्वारे मोठी कमाई करत होते. एवढ्यावरच न थांबता त्यांनी कायद्यांना बगल देण्यासाठी संपूर्ण व्यवस्था केली होती. या रॅकेटबाबत एका तरुणीने मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी 4 फेब्रुवारी 2021 रोजी गुन्हा दाखल केला होता. काही लोक मुलींना चित्रपट आणि ओटीटीमध्ये संधी देण्याचं आमिष दाखवत अश्लील चित्रफितींमध्ये काम करण्यास भाग पाडत असल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. यासोबतच मुंबईतील अनेक व्यावसायिक अश्लील चित्रपटांचे शूटिंग करून मोठी कमाई करत आहेत. यानंतर पोलिसांनी मालाड पश्चिम भागातील एका बंगल्यावर छापा टाकला होता. या ठिकाणी एका अश्लील चित्रफितीचं शूटिंग केलं जात होतं. यानंतर या छाप्यात एका बॉलिवूड अभिनेत्रीसह 11 जणांना अटक करण्यात आली होती.


हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT