शारीरिक संबंध ठेवून… महिला पोलीसच करायची भयंकर कृत्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

women police active in honey trap gang
women police active in honey trap gang
social share
google news

देशभरात हनी ट्रॅपच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत जिल्ह्यात एक हनी ट्रप करणारी गँग सक्रिय होती. विशेष म्हणजे या गॅंगला पोलिस दलातील एक महिला पोलिसच संरक्षण पुरवत होत्या. त्यामुळे शहरातील अनेक श्रीमंत या हनी ट्रॅपचे शिकार होत होत होते. आता या हनीट्रॅप चालवणाऱ्या आरोपींना आणि महिला पोलिसांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान ही हनी ट्रॅप गँग शहरात कशाप्रकारे सक्रिय होती? तसेच ही गँग अटक करण्यात पोलिसांना कसे यश आले? हे जाणून घेऊयात. (rich people caught and make physical relations women police active in honey trap gang)

ADVERTISEMENT

घटनाक्रम काय?

राजस्थानच्या नागोरमध्ये महिला हेड कॉन्स्टेबल पदावर असलेल्या राजकुमारी मीना या काही तरूणींसोबत हनी ट्रॅप करणारी गॅंग चालवत होत्या.या गॅंगमधील तरूणी श्रीमंत माणसांना हेरून त्यांच्यासोबत शारीरीक संबंध प्रस्थापित करायच्या आणि त्याचे फोटो आणि् व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करून लूबाडायच्या. या तरूणी श्रीमंताना फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची अथवा पोलिस ठाण्यात तक्रार करण्याची धमकी देऊन त्यांना लुबाडायच्या. या तरूणीनंतर महिला कॉन्स्टेबल श्रीमंताना तक्रारीची भीती दाखवून लुबाडायची.

हे ही वाचा>> शिर्डी हादरलं! सख्ख्या भावानेच केली अल्पवयीन बहिणीची निर्घृण हत्या

महिला कॉन्स्टेबल खाकी वर्दीतच श्रीमंताना कॉल करून लैगिक शोषणाची खोटी तक्रार दाखल झाल्याची भीती दाखवायची. त्यानंतर प्रकरण दाबायच्या नावाखाली श्रीमंताना पुन्हा लुटायची. अशाप्रकारे महिला हेड कॉन्स्टेबल राजकुमारी मिना यांच्यासह ही गँग शहरातील श्रीमंताना टार्गेट करून लुटत होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

असा झाला गँगचा पर्दाफाश

नागोरच्या पोलिस अधिक्षक राममुर्ती जोशी यांना हनी ट्रॅप गँग शहरात सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. या गॅंगला महिला हेड कॉन्स्टेबल राजकुमारी मीना मदत करत असल्याची देखील माहिती खबरींनी दिली होती. या प्रकरणी राममुर्ती जोशी यांनी चौकशी समिती नेमली होती. या समितीला संबंधित घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.

या चौकशीत राजकुमारी मीना दोषी आढळल्या होत्या. त्यामुळे नागोरच्या पोलिस अधिक्षक राममुर्ती जोशी यांनी राजकुमारी मीना यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई केली. या प्रकरणात आता पोलिस गॅंगमधील आरोपी तरूणींचा शोध घेत आहे.तसेच या घटनेचा कसून तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> सुनेचे दोन तरुणांसोबत सुरु होते शरीरसंबंध, सासूने दरवाजाला लावला टाळा अन्…

    follow whatsapp

    ADVERTISEMENT