homepage_banner

Sana Khan: नागपूरमधील ‘त्या’ भाजप महिला नेत्याची हत्या, आरोपी निघाला…

योगेश पांडे

ADVERTISEMENT

sana khan nagpur bjp woman leader killed by his jabalpur buissine partner nagpur police arrest papu sahu in murder case
sana khan nagpur bjp woman leader killed by his jabalpur buissine partner nagpur police arrest papu sahu in murder case
social share
google news

BJP Leader Sana Khan Murder: नागपूर: महाराष्ट्रातील भाजप (BJP) महिला नेता सना खान (Sana Khan) या बेपत्ता झाल्याने नागपुरात (Nagpur) एकच खळबळ माजली होती. मात्र, आता याच सना खान यांची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी त्यांचा बिझनेस पार्टनर अमित शाहू याला अटक करण्यात आली आहे. (sana khan nagpur bjp woman leader killed by his jabalpur buissine partner nagpur police arrest papu sahu in murder case)

भाजप नेत्या सना खानची हत्या, आरोपीला अटक

नागपुरातील भाजप नेत्या सना खान यांच्या हत्येप्रकरणी नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपी पप्पू उर्फ ​​अमित साहू याला जबलपूर येथून अटक केली आहे. आरोपी पप्पू साहू याने खुनाची कबुली दिली आहे. नागपूर पोलीस आरोपीला आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी जबलपूरहून नागपुरात आणणार आहेत.

सना खान ही 1 ऑगस्ट रोजी नागपुरातील तिचा व्यावसायिक भागीदार अमित उर्फ ​​पप्पू साहूला भेटण्यासाठी नागपूरहून जबलपूरला गेली होती. जिथे त्यांच्याच वाद झाल्याने अमित साहूने सनाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. याबाबतची माहिती नागपूर शहर झोन 2चे डीसीपी राहुल मदने यांनी मुंबई Tak शी बोलताना दिली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Crime:बायकोशी वाद झाला, पित्याने पोरालाच संपवलं, धक्कादायक घटनेने शहर हादरलं

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सना खान (Sana Khan) 1 ऑगस्टपासून बेपत्ता होत्या. सना तिच्या बिझनेस पार्टनरला भेटण्यासाठी नागपूरहून मध्य प्रदेशातील जबलपूरला गेली होती, मात्र तेव्हापासून ती बेपत्ता झाली होती.

सनाने तिच्या कुटुंबीयांना सांगितले होते की, ती दोन दिवसात परत येईल. पण आठवडा झाला तरी सना परतली नाही किंवा तिच्याबाबत काहीही माहिती तिच्या कुटुंबीयांना मिळाली नव्हती. तसेच सनाचा फोन बंद असल्याने तिच्या कुटुंबीयांची चिंता वाढली होती. याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी नागपुरातील मानकापूर पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Ratnagiri: नीलिमा चव्हाणचा नेमका मृत्यू कसा झाला?, पोलिसांनी दिली मोठी माहिती

सना खान या नागपूर भाजपच्या सक्रिय महिला नेत्या होत्या. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ती जबलपूरमध्ये बिझनेस पार्टनर पप्पू साहू याला भेटायला गेली होती. पप्पू साहू हा दारूच्या तस्करीत गुंतला होता आणि तो जबलपूरजवळ ढाबा चालवत असे. हा ढाबा पप्पू आणि सना या भागीदारीमध्ये चालवत होते. पण येथील पैशाच्या व्यवहारावरून सना आणि पप्पूमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता.

ADVERTISEMENT

दरम्यान, सना खान बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर तिच्या शोधात पोलिसांचे एक पथक जबलपूरला पाठविण्यात आलं होतं. तब्बल 10 दिवसानंतर सना खान हिची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागपूर भाजपमधील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT