Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचं भिवंडी कनेक्शन आहे तरी काय?
Santosh Deshmukh Murder Case News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी वाल्मिक कराडने सीआयडीसमोर (SIT) शरणागती पत्करली. पण त्यानंतर...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आरोपी सुदर्शन घुलेबाबत धक्कादायक माहिती समोर

संतोष देशमुख हत्या प्रकरणात भिवंडी कनेक्शन काय?

...आरोपी आरोपी गुजरातला पळून गेले
Santosh Deshmukh Murder Case latest Update : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी वाल्मिक कराडने सीआयडीसमोर (SIT) शरणागती पत्करली. त्यानंतर सीआयडीने फरार असलेला मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेच्या पुण्यातून मुसक्या आवळल्या. दरम्यान या हत्येप्रकरणी तीन मुख्य आरोपींचं भिवंडी कनेक्शन समोर आलंय. सुदर्शन घुले आणि त्याचे दोन साथीदार 11 डिसेंबरला भिवंडीत एका ओळखीच्या व्यक्तीला भेटण्यासाठी गेले. परंतु, तिथे त्यांना लपण्यासाठी जागा मिळाली नाही. त्यामुळे ते गुजरातला पळून गेले.
हत्या झाल्यानंतरचा घटनाक्रम
9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सुदर्शन घुले आणि त्याचे साथी 11 डिसेंबरला भिवंडीचे सामाजिक कार्यकर्ते सोन्या पाटीला यांच्या कार्यालयात पोहोचले. त्यानंतर त्यांनी सोन्या पाटील यांचे भाऊ जयवंत पाटील यांच्याशी बोलणं झालं आणि विक्रम डोईफोडेंचं नाव सांगितलं. जे संतोश देशमुख यांच्या गावातील रहिवासी असून ते त्यावेळी वैष्णव देवी यात्रेला गेले होते.जयवंत पाटील यांनी सुदर्शन घुलेची ओळख पटवण्यासाठी विक्रम डोईफोडेंना त्याचा फोटो पाठवला. डोईफोडेने फोटो पाहून सांगितलं की, आरोपी हत्या प्रकरणात सामील आहे. त्यानंतर डोईफोडेने आरोपींना आश्रय देण्यास नकार दिला.
हे ही वाचा >> 6 January 2025 Horoscope : 'या' राशीच्या लोकांनी आईच्या आरोग्याची काळजी घ्या! काहींचं आर्थिक उत्पन्न भरमसाठ वाढेल
बार आणि रेस्टॉरंटमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न
आरोपी सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार रवी बारगजे नावाच्या एका तरुणाला भेटले. जो विक्रम डोईफोडे यांच्या बार आणि रेस्टोरंटमध्ये काम करत होता. त्यानंतर रवीने डोईफोडेंना संपर्क करत आरोपी मदत मागत असल्याचं सांगितलं. त्यानंतप डोईफोडेंनी त्यांना आश्रय न देण्याबाबत स्पष्टपणे नकार दिला.
भिवंडीत का गेले आरोपी?
संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सुदर्शन घुलेला माहिती होतं की, भिवंडीत सोन्या पाटील आणि विक्रम डोईफोडेचा नेटवर्क आहे. त्यामुळे त्यांनी पाटीलच्या कार्यालयात विक्रमबाबत विचारपूस केली. परंतु, या घटनेबाबत त्यांना माहिती मिळताच आरोपींना आश्रय देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपींना भिवंडीत लपता आलं नाही आणि त्यांनी तेथून पळ काढला.
हे ही वाचा >> Suresh Dhas: "सर्व पुरावे या सतरा मोबाईलमध्ये..."; संतोष देशमुख हत्याप्रकरणी सुरेश धसांचं खळबळजनक विधान!