Santosh Deshmukh: 'सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून झालेली सुदर्शन घुलेला मारहाण', कोण आहे हा सुग्रीव कराड?
Who is Sugriv Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींनी जबाब देताना असं सांगितलं की, सुग्रीव कराड याच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली होती. त्याचाच बदला हा सुदर्शन घुलेने नंतर घेतला.
ADVERTISEMENT

Santosh Deshmukh murder case: योगेश काशिद, बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांमध्ये आता आणखी एक नाव समोर आलं आहे. आरोपी महेश केदार आणि जयराम चाटे यांच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. जयराम चाटे आणि महेश केदार यांनी जो कबुली जबाब दिला आहे त्यामध्ये मस्साजोग गावचे सुग्रीव कराड यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.
फरार कृष्णा आंधळेने सुदर्शन घुलेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी संतोष देशमुखला धडा शिकवायचा आहे. असे आम्हाला सांगितल्याचं जयराम चाटे आणि महेश केदार याने आपल्या जबाबात सांगितलं आहे.
जयराम चाटे आणि महेश केदार यांचा जबाबात सुग्रीव कराड हे नाव कुठून आलं समोर?
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे हे सातत्याने होत आहे. आता याचप्रकरणी मस्साजोग गावतील सुग्रीव कराड या व्यक्तीचं नाव हे जयराम चाटे आणि महेश केदार यांच्या जबाबातून समोर आलं आहे. या दोन्ही आरोपींचा नेमका जबाब काय आहे हे आपण जाणून घेऊया.
जयराम चाटे आणि महेश केदार यांनी जो कबुली जबाब दिला आहे त्यामध्ये मस्साजोग गावचे सुग्रीव कराड यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.
हे ही वाचा>> संतोष देशमुखांना असं मारलं.. 15 Video ची मिनिट टू मिनिट माहिती, तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल!
जबाबानुसार, 'सुदर्शन घुलेला सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून सरपंच संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी मारहाण केली होती. त्यावरून घुले आणि वाल्मिक अण्णाची बदनामी झाली आहे त्याचा आपल्याला बदला घ्यायचाय. असं कृष्णा आंधळेने आम्हाला सांगितलं होतं.'
जयराम चाटे आणि महेश केदार यांनी दिलेल्या जबाबात खंडणीचा मात्र कुठेही उल्लेख नाही. तर सुदर्शन घुलेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच म्हणून संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली असं त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं होतं?
6 डिसेंबर रोजी आवादा कंपनी परिसरात सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीने तेथील सुरक्षा रक्षकाला मारहाण केली होती. यावेळी ही माहिती जेव्हा संतोष देशमुखांना समजली तेव्हा ते तात्काळ घटनास्थळी गेले. त्यानंतर संतोष देशमुख यांनी त्या ठिकाणी येऊन काम करणाऱ्या लोकांना मारहाण करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या. असं घुले आणि त्यांच्या टोळीतील इतरांना सांगितलं. पण यावरून संतोष देशमुख आणि आरोपी सुदर्शन घुलेमध्ये जोरदार वाद झाला.
हे ही वाचा>> Santosh Deshmukh Case : "मीच अपहरण करून संतोष देशमुखांना संपवलं", पोलिसांसमोर 'या' आरोपीची कबुली
पण याच वादानंतर आपला अपमान झाला असा राग मनात धरून संतोष देशमुख यांचा बदला घेण्यासाठी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून सुदर्शन घुलेने त्याच्या साथीदारांसह देशमुखांची क्रूर हत्या केली. मात्र आता कबुली जबाबात सुग्रीव कराड हे नाव समोर आलं आहे.
कोण आहे सुग्रीव कराड?
सुग्रीव कराड हा मूळचा केजचा रहिवासी आहे. तो एक स्थानिक पातळीवर राजकारणात सक्रीय असलेल्या कुटुबांतून आलेला आहे. त्याची आई ही केजच्या पंचायत समितीची सदस्य होती. तर त्याची पत्नी देखील नगरसेविका होती. सुग्रीव कराड हा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंसाठी स्थानिक राजकारणासाठी काम करत असल्याचंही बोललं जातं. तसंचतो खासदार बजरंग सोनावणेंचे विरोधकही आहे.
केज नगरपरिषद निवडणुकीत बजरंग सोनवणेंच्या मुलीविरोधात त्याच्या पत्नीने निवडणूक देखील लढवली होती. ज्यामध्ये सुग्रीव कराडची पत्नीने विजयही मिळवला होता.
दरम्यान, आता अशीही माहिती समोर येत आहे की, आरोपींना पकडून देण्यासाठी सुग्रीव कराडनं SIT ला मदत केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. संभाजी वायबसे आणि पत्नीला ताब्यात घेतल्यास अधिक माहिती मिळेल अशी माहिती सुग्रीव कराडनं SIT ला दिल्याचंही सूत्रांनी सांगितलंय.