शिर्डी हादरली, साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या CCTV मध्ये कैद!

राहुल गायकवाड

Shirdi Murder: शिर्डीतील साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्याची पहाटेच्या सुमारास हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शिर्डीत बरीच खळबळ माजली आहे.

ADVERTISEMENT

शिर्डीतील साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या
शिर्डीतील साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या
social share
google news

Shirdi Sai Sansthan employees  Murder: शिर्डी: शिर्डीतील पहाट दुहेरी हत्याकांडाने हादरुन गेली. पहाटे शिर्डीतील तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात साई संस्थांनच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर एक तरुण जखमी झाला आहे. या घटनेमुळे शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही देखील आता समोर आला आहे. 

साई संस्थानच्या दोघांचा खून, नेमकं घडलं तरी काय?

सुभाष घोडे आणि नितीन शेजुळ अशी साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांची नावं आहेत. घोडे आणि शेजुळ पहाटेच्या सुमारास कामावर येत होते. यावेळी दुचाकीवरुन हल्लेखोरांनी त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला केला. या दोघांबरोबरच कृष्णा देहरकर या तरुणावर देखील हल्लेखोरांनी चाकू हल्ला केला. यात देहरकर गंभीर जखमी झाला आहे.

हे ही वाचा>> Pune: 'तिच्यावर बलात्कार करून, हत्या कर..', सातवीच्या मुलाने दिली 100 रुपयांची सुपारी

चोरीच्या अनुषंगाने हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर मृतांचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी पोलिसांवर देखील गंभीर आरोप केलेत.

मारेकऱ्यांनी हत्या केलेले साई संस्थानचे दोन कर्मचारी

पोलिसांनी खूनऐवजी अपघात झाला म्हटल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे. न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका मृतांच्या नातेवाईकांनी घेतली आहे. 

हे ही वाचा>> पुण्यात लेकरासमोर पत्नीला मारलं ठार, कात्रीच खुपसली अन् नंतर Video केला व्हायरल

दरम्यान, ज्या पोलीस अधिकाऱ्याने हा अपघात असल्याचं सांगितलं त्याला निलंबित केलं जाईल. असं सुजय विखे-पाटील हे म्हणाले आहेत. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडे चौकशी सुरु आहे. त्यामुळे हे खून नेमके कुठल्या कारणामुळे झाले हे आता तपासातून स्पष्ट होऊ शकणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp