Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी! कोर्टात काय घडलं?

मुंबई तक

Santosh Deshmukh Murder Case Latest Update:  बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील सहा आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपली. दरम्यान, या आरोपींची बीड जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

ADVERTISEMENT

Santosh Deshmukh Murder Case Latest Update
Santosh Deshmukh Murder Case Latest Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

point

वाल्मीक कराडला न्यायालयातून नेत असताना जोरदार घोषणाबाजी

point

सुनावणीवेळी न्यायालय परिसरात झाली लोकांची गर्दी

Santosh Deshmukh Murder Case Latest Update:  बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील सहा आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत आहे. यामुळे त्यांना आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. संतोष देशमुख यांच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक असलेल्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.आरोपींना १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, या हत्याप्रकरणी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे या आरोपींचा समावेश आहे. कोर्टात या प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा घेण्यात आली. सरकारी वकीलांनी आरोपींची पोलीस कोठडी मागितली नाही. त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठणी ठोठावण्यात आलीय. याप्रकरणी आरोपी आता जामीनासाठी अर्ज दाखल करू शकतात.

वाल्मीक कराडच्या पोलीस कोठडीवर बीडच्या न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना न्यायालय परिसरातच जोरदार घोषणाबाजी झाली होती. दोन गट समोरासमोर आल्याने एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे पोलिसांना या ठिकाणी सौम्य लाठीमारदेखील करावा लागला. 

सुधीर सांगळे व सुदर्शन घुले, सिद्धार्थ सोनवणे हे माजलगाव येथील पोलीस कोठडीत आहेत, तर जयराम साठे, प्रतीक घुले व महेश केदार गेवराई पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहेत. न्यायालय आवारात सुनावणी वेळी होत असलेली गर्दी पाहता पोलीस प्रशासनाकडून खबरदारी देखील घेतली होती. सुरेखा पाटील यांच्या निकालानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात या आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

हे ही वाचा >> Saif Ali Khan Case : आरोपी 5 तास वांद्रेमध्येच होता, एअरफोनही खरेदी केले, CCTV मध्ये काय काय आढळलं?

वाल्मिक कराड यांना धनंजय मुंडे वाचवतात, संदीप क्षीरसागर यांचा आरोप

"मी सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगतोय की, एकतर मास्टरमाईंड म्हणून ते आहेत. त्यांना धनंजय मुंडेंचं संरक्षण मिळत आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. वाल्मिक कराड ज्या पद्धतीने सरेंडर होतात आणि प्रशासनाला समोर जातात. सरेंडर झाल्यावर अंगावर गमछा, हातात दोरे असतात, तशीच ट्रींटमेंट त्यांना भेटते. त्यांच्यापर्यंत तपास आला की थांबतो. हा विषय संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. त्या कालावधीमधले मोबाईलचे सर्व सीडीआर तापसले, तर सर्वकाही लक्षात येईल", अशी खळबळजनक प्रतिक्रिया आमदार संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. 

हे ही वाचा >> Saif Ali Khan Case : "सैफ हल्लेखोराला भिडला म्हणून जहांगीर...", करीना कपूरचा वांद्रे पोलिसांना जबाब


हे वाचलं का?

    follow whatsapp