Solapur crime News : ऊसतोड कामगार भाऊ-बहिणींचं अपहरण, तक्रार करूनही पोलिसांचं दुर्लक्ष? सोलापुरात धक्कादायक घटना
कर्नाटकातील अफजलपूर येथील शिवबा हत्ती यांच्याकडून ऊस तोडण्यासाठी दोन लाख रुपये घेतले होते. परंतु मजूर न आल्यानं पैसे न दिल्यानं संतापलेल्या शिवबा हत्तीने त्यांच्या इतर साथीदारांसह सजनू पवार व यशोदा काळे यांचं घरातून अपहरण केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये धक्कादायक घटना

भाऊ बहिणींचं अपहरण, कारण काय?
राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे सध्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतोय. कल्याण, पुणे, बीडच्या घटना ताज्याच असताना आता सोलापूरमध्येही एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दोन लाख रुपयांसाठी दोन भाऊ-बहिणींचं अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. संतापजनक म्हणजे पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याची माहिती समोर आली आहे.
भाऊ-बहिणींचं अपहरण केल्यानतंर आरोपींनी व्हिडीओ कॉलद्वारे 7 लाखांची मागणी केली. सजनू पवार आणि त्यांची बहीण यशोदा हे ऊसतोडीचं काम करतात. कर्नाटकातील अफजलपूर येथील शिवबा हत्ती यांच्याकडून ऊस तोडण्यासाठी दोन लाख रुपये घेतले होते. परंतु मजूर न आल्यानं पैसे न दिल्यानं संतापलेल्या शिवबा हत्तीने त्यांच्या इतर साथीदारांसह सजनू पवार व यशोदा काळे यांचं घरातून अपहरण केलं.
हे ही वाचा >> Satish Wagh Case : पतीला संपवणाऱ्या मोहिनी वाघ नेमकं का रडत होत्या? पश्चाताप की नाटक? VIDEO का व्हायरल...
तक्रारदार धमाबाई पवार या अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या असता, त्यांची तक्रार स्वीकारण्यात आली नाही. त्यांची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली, मात्र अपहरण होऊन पाच-सहा दिवस उलटूनही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे आरोपी धमाबाई पवार यांना व्हिडिओ कॉल करून पती सजनू पवार याला झाडाला बेड्या ठोकल्याचं दाखवत आहे. सात लाख रुपये दे अन्यथा तुझ्या पतीला बुडवून नदीत फेकून देईन, अशी धमकी देत असल्याचे धमाबाई पवार यांनी सांगितले.
हे ही वाचा >> Nanded : हॉर्न वाजवल्याचा राग, तरूणानं थेट फॉर्च्युनवर चढून हल्ला केला, गाडी चालवणाऱ्या डॉक्टरने थेट...
भटक्या विमुक्त जातीच्या नागरिकांना पोलिसांकडून नेहमीच सहकार्य केलं जात नाही असा आरोप करत राजश्री चव्हाण यांनी गंभीर इशारा देत अपहरण झालेल्या दोन्ही बहीण-भावांच्या जीवाला धोका झाल्यास अक्कलकोट दक्षिण पोलिस जबाबदार असतील, असं सांगितलं.