सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच! 'त्या' रिपोर्टमध्ये समजलं; आजपर्यंत काय काय घडलं? A टू Z स्टोरी
Somanth Suryawanshi Death Case: सोमनाथचा मृत्यू पोलीस कोठडीत असताना झालेल्या मारहाणातील झाल्याचं कुटुंबाचं म्हणणं होतं. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात Shock Following Multiple Injuries असं मृत्यूचं कारण समोर आलं होतं. मात्र, प्रशासनाने नैसर्गिग मृत्यू असल्याचा दावा केला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

"सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच"

एक सदस्यीय समितीच्या चौकशीचा अहवाल

सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबाचे आरोप खरे ठरले
Somnath Suryawanshi Case : गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात परभणीमध्ये सोमनाथ सुर्यवंशी नावाच्या तरूणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. पोलिसांच्या मारहाणीत हा मृत्यू झाल्याचा आरोप सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबीयांनी केला होता. याप्रकरणी तेव्हा एका पोलीस अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर या प्रकरणात एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा अहवाल आता समोर आला असून, पोलिसांवरच ठपका ठेवण्यात आला आहे.
सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणी नेमण्यात आलेल्या एक सदस्यीय समितीने तपास पूर्ण करुन अहवाल राज्य मानविधाकिरा आयोगासमोर ठेवलाय. 451 पानांच्या या अहवालाची मानवाधिकार आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. तसंच या प्रकरणाशी संबंधित सर्व पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस जबाबदार आहे. परभणीतील नवामोंढा पोलीस ठाण्यात त्यांना मारहाण करण्यात आली होती असं अहवालात नमूद केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या पोलिसांवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
सोमनाथ सुर्यवंशसोबत काय घडलं होतं?
10 डिसेंबरला परभणीमध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची विटंबना झाली होती. त्यानंतर 11 डिसेंबरला आंबेडकरी अनुयायांनी निदर्शनं केली, त्यावेळी आंदोलनाला गालबोट लागलं. शहरात बऱ्याच ठिकाणी जाळपोळ, तोडफोड झाल्यानंतर पोलिसांनी जवळपास 50 जणांची धरपकड केली होती. अटक केलेल्यांमध्ये सोमनाथही होता. त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. सोमनाथ सुर्यवंशीला दोन दिवसानंतर न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. त्यानंतर 15 डिसेंबरला सोमनाथचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला.
हे ही वाचा >> Yashwant Verma : जजच्या बंगल्याला आग, विझवताना सापडली भली मोठी कॅश, CJI कडून थेट बदलीचा निर्णय
कुटुंबाचा आरोप काय होता?
सोमनाथचा मृत्यू पोलीस कोठडीत असताना झालेल्या मारहाणातील झाल्याचं कुटुंबाचं म्हणणं होतं. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात Shock Following Multiple Injuries असं मृत्यूचं कारण समोर आलं होतं. त्यानंतर 18 डिसेंबरला तारखेला कुटुंबाने पोलिसांना फिर्याद दिली. परभणीमध्ये झालेल्या पोलीस अपयशाच्या प्रकरणात राज्य मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दोषी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश दिले होते.
एक सदस्यीय समिती गठीत
15 जानेवारी 2025 अन्वये सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व्ही.एल. आचलिया यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे. 16 जानेवारीला लाँग मार्च निघाला, तो 10 मार्चला मुंबईत धडकणार होता, मात्र परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, सुरेश धस यांच्या हस्तक्षेपानंतर तो नाशिकमध्ये स्थगित झाला.
हे ही वाचा >> Devendra Fadnavis : गोहत्या करणाऱ्यांवर मकोका लावणार, काय आहे मकोका, गुन्हेगारांना धाक का?
कोण कोण निलंबित?
दोन महिन्यांनी तीन पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक कर्तिकेश्वर तूरनर, पोलीस कर्मचारी सतीश दैठणकर, मोहित पठाण, राजेश जठाल यांचे निलंबन झालं होतं. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना आधीच निलंबित केलेलं होतं. (घोरबांड यांच्यावर कोंबिंगदरम्यान मारहाण केल्याचेही आरोप आहेत) घोरबांड निलंबित असतानाच परभणीमध्ये DCM शिंदेंसोबत वावरतानाचा फोटो समोर आला होता. त्यामुळे त्यावेळी टीकाही झाली होती.