तोंडातच सुतळी बॉम्ब फोडून केली आत्महत्या, तरुणाने का उचललं टोकाचं पाऊल?
घटस्फोट घेतलेल्या तरुणाने तणावातून आत्महत्या केल्याची घटना राजस्थानमधील बांसवाडामध्ये घडली. मात्र त्याने केलेली आत्महत्या बघून अनेकांचा थरकाप उडालेला आहे, कारण तोंडात सुतळी बॉम्ब ठेऊन आत्महत्या केली आहे. त्या स्फोटामुळे त्याचा चेहरा विद्रूप झाला होता, तर घरात सगळा रक्ताचा सडा पडला होता.
ADVERTISEMENT
Suicide Case : घरामध्ये तीन दिवसापूर्वी बहिणीच्या लग्नाची धामधूम होती. त्या लग्नातील पाहुणेही अजून घरातून गेले नव्हते. ज्या घरातून लेकीला आनंदाने सासरी पाठवले त्याच घरातून तीन दिवसानंतर नववधूच्या भावाची तीन दिवसांनी अंत्ययात्रा निघाली. राजस्थानमध्ये बांसवाडा शहरातील ही हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील एका युवकाने आपल्या तोंडात सुतळी बॉम्ब () ठेवून त्याला आग लावून फोडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
परिसराती ही दुसरी घटना
ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे. त्यानंतर फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी तपास केल्यानंतर सांगितले की, पाच वर्षापूर्वी मृत युवकाचा घटस्फोट झाला होता, त्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होता. याआधी मे महिन्यामध्येही अशीच एक घटना घडली होती, त्यामध्ये एका युवकाने डेटोनेटरचा स्फोट करून आत्महत्या केली होती.
हे ही वाचा >> Manoj Jarange : ‘तुम्ही विचार करायचा होता ना?’, जरांगे पाटलांनी पकडलं कात्रीत
आईला बाथरुममध्येच केलं बंद
बांसवाडा शहरातील वाडिया मोहल्लामध्ये ही घटना घडली तेव्हा अनेकांना धक्का बसला, कारण 34 वर्षाच्या हिमांशू गोयलने भयंकर पद्धतीने आत्महत्या केली. तीन दिवसापूर्वीच त्याच्या बहिणीचे थाटामाटात लग्न झाले होते. त्याच्या बहिणीच्या लग्नानंतर त्याची आई आणि तो दोघच घरी राहत होते. त्याच्या वडिलांचे आधीच निधन झाले आहे, तर त्याची आई सेवानिवृत्त शिक्षिक आहे. दुपारी आई आणि हिमांशू दोघच घरी होती, त्याची आई ज्यावेळी बाथरूमध्ये गेली, तेव्हा हिमांशूने बाहेरून दरवाजा बंद करून घेतला, त्यानंतर घरातच जोरदार आवाज आला. त्यावेळी त्याची आई घाबरली आणि त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या बाहेर येऊ शकल्या नाहीत, कारण हिमांशूने बाथरूमचा दरवाजा बाहेरून बंद करुन घेतला होता.
हे वाचलं का?
चेहरा झाला विद्रूप
हिमांशूच्या घरातून जोरदार आवाज आल्यानंतर परिसरातील लोकांनी त्याच्या घराच्या दिशेने धाव घेतली. मात्र घराचा दरवाजाही आतून बंद करण्यात आला होता, त्यामुळे लोकांनी ज्यावेळी घर तोडून आत प्रवेश केला त्यावेळी मात्र सगळ्यांना धक्काच बसला. कारण घराच्या भिंतीवर रक्ताचा सडा पडला होता आणि हिमांशूचा चेहरा ओळखण्यासारखा राहिला नव्हता. त्याचवेळी बाथरुमध्ये त्याच्या आईचाही आवाज येत होता, त्यावेळी आलेल्या लोकांनी बाथरूमचा दरवाजा उघडून त्याच्या आईला बाहेर काढले. पंधरा वर्षापूर्वी हिमांशूला हायव्होल्टेज तारेचा स्पर्श होऊन त्या विजेचा धक्का बसला होता, मात्र त्यातून त्याचा जीव वाचला होता असंही त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.
घटस्फोटामुळे तणावाखाली
हिमांशूने आत्महत्या केल्यानंतर शेजारी राहणाऱ्या लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. हिमांशूने तोंडात सुतळी बॉम्ब फोडून घेतल्यामुळे पोलिसांबरोबरच फॉरेन्सिक टीमही दाखल झाली. या घटनेचा तपास करताना पोलिसांना सांगितले की, हिमांशूचा पाच वर्षापूर्वी त्याचा घटस्फोट झाला होता, त्यामुळेच तो प्रचंड ताणतणावाखाली होता. आता त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> ‘चिअर्स!!!’ 24, 25 डिसेंबर आणि थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत मिळणार दारू
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT