Sudhir More : ‘माझ्याशी संबंध ठेव नाहीतर…’; आत्महत्येपूर्वी महिलेचे 56 कॉल, आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी 31 ऑगस्टला आत्महत्या केल्याची घटना घडली होती.सुधीर मोरे यांचा मृतदेह घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे रुळावर सापडला होता. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती.
ADVERTISEMENT
Sudhir More Death Case : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे (Sudhir More) यांनी 31 ऑगस्टला आत्महत्या केल्याची घटना घडली होती.सुधीर मोरे यांचा मृतदेह घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे रुळावर सापडला होता. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर सुधीर मोरे यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली आहे, असा प्रश्न उपस्थित होत होता. आता या घटनेचा पोलीस कसून तपास करून उलगडा करत आहेत. या दरम्यानच धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘माझ्याशी संबंध न ठेवल्यास आयुष्य संपवेन’ अशी सुधीर मोरे यांनी धमकी देण्यात आली होती. या धमकीसोबत आत्महत्येपुर्वी आऱोपीने सुधीर मोरे 56 कॉल केले होते. या आधारावर पोलिसांनी आरोपीची चौकशी सूरू केली आहे. (sudhir more death case accused women calling 56 time killing and death train shivsena udhhav thackeray camp)
ADVERTISEMENT
सुधीर सयाजी मोरे यांनी घाटकोपर आणि विद्याविहार दरम्यान रेल्वे रूळासमोर उडी मारून आत्महत्या केली होती. 31 ऑगस्टला ही घटना घडली होती. या घटनेनंतर सुधीर मोरे यांच्या मुलाने वकील निलीमा चव्हाण यांच्याविरूद्ध वडिलांचा छळ केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे अटकेच्या भीतीपोटी अटकपूर्व जामीनासाठी निलीमा चव्हाण यांनी सत्र न्यायलयात धाव घेतली होती.
हे ही वाचा : Maratha Morcha : मनोज जरांगे पाटलांनी जीआर नाकारला, CM शिंदे काय म्हणाले?
कोर्टात वकील काय म्हणाले?
दरम्यान या प्रकरणात सरकारी वकील म्हणून आणि पोलिसांतर्फे इक्बाल सोलकर यांनी कोर्टात बाजू मांडली होती. यावेळी सोलकर यांनी या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले. माझ्याशी संबंध ठेवले नाहीस तर आयुष्य संपवेन अशी धमकी नीलिमा चव्हाण यांनी सुधीर मोरे यांना दिली होती. याचसोबत सुधीर मोरे यांनी बोलणे बंद केल्यानंतर नीलीमा चव्हाण यांनी त्यांना ब्लॅकमेल करायला सुरूवात केली होती. तसेच ज्या दिवशी सुधीर मोरे आत्महत्या करणार होते, त्या दिवशी नीलीमा चव्हाण यांनी तिला 56 वेळा फोन कॉल केले होते. यासोबत व्हॉट्सअॅपवर ऑड़िओ आणि व्हिडिओ कॉलही केले होते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
विशेष म्हणजे नीलिमा चव्हाण यांच्याकडून छळ सुरु असताना सुधीर मोरे यांनी छळ थांबण्याची विनंती केली होती. मात्र नीलिमा चव्हाण यांनी त्याचं काही एक ऐकलं नव्हतं असा युक्तीवाद इक्बाल सोलकर यांनी कोर्टात केला होता. हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.
दरम्यान या प्रकरणात नीलिमा चव्हाण यांनी सुधीर मोरे यांना मानसिक त्रास दिल्याचा दावाही पोलिसांनी केला होता. त्यामुळे नीलिमा चव्हाण यांचा जामीन फेटाळला होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : एकनाथ शिंदेंचा निरोप घेऊन अर्जून खोतकर मनोज जरांगे पाटलांना भेटले, काय झाली चर्चा?
ADVERTISEMENT