Crime : पत्नीला आधीपासूनच होता मुलगा, सत्य समजताच नवऱ्याने दाखवलं खरं रूप!
Thane Crime News : ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका सावत्र बापाने आपल्या सावत्र मुलाचा शारीरिक छळ करून खून केल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पहिल्या लग्नातून पत्नीला मुल असल्याचे समजताच, सावत्र पित्याने केला भयानक शेवट
पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सावत्र बापाच्या गैरकृत्यांचा खुलासा
Thane Crime News : ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका सावत्र बापाने आपल्या सावत्र मुलाचा शारीरिक छळ करून खून केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपी सावत्र बापाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. (thane crime news step father killed brutally four year old stepson)
ADVERTISEMENT
ठाणे जिल्ह्यातील चितळसर परिसरात ही घटना घडली. येथे अल्पवयीन मुलाच्या आईने पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर आरोपीसोबत दुसरे लग्न केले होते. लग्नानंतर ती दुसऱ्या पतीसोबत राहत होती. काही आठवड्यांपूर्वी ही महिला तिचा चार वर्षांचा मुलगा मोहम्मद आर्यन याला कोलकाताहून तिच्या घरी घेऊन आली होती. पोलिसांनी सांगितले की, आरोपीला पत्नीच्या पहिल्या लग्नातून मुल असल्याची माहिती नव्हती.
हेही वाचा : Yashashree Shinde : दाऊद शेखने हत्या करण्यापूर्वी यशश्रीला किडनॅप केले होते?
मिळालेल्या माहितीनुसार, महिला जेव्हा मुलाला घेऊन आली तेव्हा दोघांमध्ये खूप भांडण झाले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी दिलशाद त्या मुलाला घरी आणल्याबद्दल नाराज होता आणि त्याने मुलाची जबाबदारी घेण्यासही नकार दिला होता.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सावत्र बापाच्या गैरकृत्यांचा खुलासा
मुलाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी रविवारी (28 जुलै) अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, मृतदेहाच्या पोस्टमार्टम अहवालात मुलावर गंभीर शारीरिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या बरगड्या आणि हाडे अनेक ठिकाणी तुटल्याचे आणि पोटात अंतर्गत जखमा असल्याचेही आढळून आले. त्यानंतर सावत्र बापाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा : Mirzapur 3 : 'त्या' हॉट सीनवर काय बरंच काही बोलली सलोनी भाभी!
पोलिसांनी सांगितले की, दिलशाद असे आरोपीचे नाव असून त्याला सोमवारी (29 जुलै) रात्री अटक करण्यात आली. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103 (हत्या) अन्वये चितळसर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT