Thane : दिवसाढवळ्या मनसे नेत्याची झाली होती हत्या, 3 वर्षानंतर आरोपीला ठोकल्या बेड्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्याची ठाण्यात तीन वर्षापूर्वी हत्या झाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या प्रकरणी अनेकांना अटक केली होती. तीन वर्षानंतर या हत्या प्रकरणी आता आणखी एकाला अटक केली आहे. पाठलाग करुन दिवसढवळ्या नेत्याची हत्या झाल्यानंतर ठाणे शहर हादरले होते.
ADVERTISEMENT
Thane Murder Case: ठाणे शहरात तीन वर्षापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (maharashtra navnirman sena) नेत्याची हत्या (Leader murder) झाली होती. त्या प्रकरणी रविवारी आणखी एका आरोपीला अटक (accused arrested) करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितले नेत्याच्या हत्येप्रकरणी हबीब अजमैन शेखला अटक केली आहे. जमील शेख (Jameel Shaikh) यांची हत्या झाल्यापासून आरोपींचा शोध सुरु होता. आता एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणातील आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली. (maharashtra navnirman sena leader shot dead thane, accused arrested)
ADVERTISEMENT
आधीच दोन आरोपींना अटक
पक्षाच्या राबोडी प्रभागचे अध्यक्ष मनसे नेते जमील शेख यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणीच हबीब शेख पोलिसांच्या शोधात होते. नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या गोळीबारात सहभागी झाल्याबद्दल पोलिसांनी याआधीच शैद शेख आणि इरफान सोनूला अटक केली होती.
हे ही वाचा >>‘तू भेटायला आली नाहीस तर…’, युवकाने आमदाराच्याच घरात संपवली जीवनयात्रा
दुचाकीवरुन जाताना हल्ला
मनसे नेते जमील शेख राबोडीमध्ये 23 नोव्हेंबर 2020 आपल्या दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. त्यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी हत्या करणाऱ्यांवर कलम 302 नुसार त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणातील आरोपींचा पोलीस शोध घेत होते.
हे वाचलं का?
आणखी एक फरार
जमील शेख यांच्या हत्या प्रकरणातील अनेक पुरावे पोलिसांना मिळाले होते. त्यामध्ये हबीब शेख याचा सहभाग असल्याचेही समजले होते. त्यामुळे त्यालाही आता ताब्यात घेण्यात आले आहे. तर या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा >> संजय राऊत, दानवेंच्या अडचणी वाढणार? नितेश राणेंची विधिमंडळ सचिवांकडे तक्रार
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT