Pune Crime : बारावीच्या विद्यार्थ्याची मित्रांकडूनच हत्या, दोन विहिरींमध्ये कापून फेकले मृतदेहाचे तुकडे, प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावीत शिकणारा माऊली गव्हाणे विद्यार्थी बारावीची परीक्षा देण्यासाठी पुणे जिल्ह्यात गेला होता. 6 मार्चला हा विद्यार्थी अचानक बेपत्ता झाला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बारावीच्या विद्यार्थ्याची निघृण हत्या

तलवारीने कापून शरिराचे तुकडे विहीरीत फेकले

दोन विहिरींमध्ये फेकले शरिराचे तुकडे
Pune Crime : 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनं पुणे आणि अहिल्यानगर जिल्हा अक्षरश: हादरला आहे. कारण ज्यांनी हे भयंकर कृत्य केलं, ते मारेकरी सुद्धा मृत विद्यार्थ्याच्याच वयाचे त्याचे शाळकरी मित्र आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 19 वर्षीय तरुणाला अटक केली. तसंच एका अल्पवयीनाला ताब्यात घेतलं आहे. या विद्यार्थ्यांनं आम्हाला बदनाम केल्याचा आरोप आरोपींनी केला आहे. याच कारणामुळे आरोपींनी तलवारीनं वार करून मृतदेहाचे तुकडे केले आणि विहिरीत फेकून दिलं. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
हे ही वाचा >> DCP वर कुऱ्हाडीने हल्ला, नागपूरचा हिंसाचार होता प्रचंड भयंकर.. वाचून तुमच्याही अंगावर येईल काटा!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावीत शिकणारा माऊली गव्हाणे विद्यार्थी बारावीची परीक्षा देण्यासाठी पुणे जिल्ह्यात गेला होता. 6 मार्चला हा विद्यार्थी अचानक बेपत्ता झाला होता.विद्यार्थी घरी न परतल्यानं त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र तो सापडत नव्हता. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
दोन विहिरींमध्ये टाकले शरिराचे तुकडे
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर थेट 12 मार्चला पुणे-अहिल्यानगरच्या सिमेवर असलेल्या दाणेवाडी गावाजवळच्या विहिरीत मृतदेहाचे छिन्नविछिन्न हातपाय आणि धड आढळून आले. तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या एका विहिरीतून डोकं आणि दोन्ही हात गोणीत भरलेले सापडले. मयताच्या दोन मित्रांनी हा निर्घृण खून केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
हे ही वाचा >> Palghar Crime: उत्कलाचं शीर छाटलं अन्... अखेर 'तो' जाळ्यात अडकलाच!
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यानं आमची बदनामी केल्याचा आरोप आरोपींचा आहे. या कारणावरून आरोपींनी त्याच्या हत्येचा कट रचला आणि तलवारीनं हत्या केली. मृतदेहाचे तुकडे केले आणि विहिरीत फेकून दिले. सध्या 19 वर्षीय आरोपी पोलीस कोठडीत आहे. तर अल्पवयीन आरोपीला सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, संभाव्य कारणांचाही शोध घेतला जातोय. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली.