महिलेने नको ‘त्या’ ठिकाणी लपवलेलं 8.9 कोटींचं कोकेन, मुंबईत महिलेला अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

ugandan woman arrested cocaine worth 8.9 crore mumbai international airport
ugandan woman arrested cocaine worth 8.9 crore mumbai international airport
social share
google news

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) एका युगांडाच्या महिलेला (Uganda women) 8.9 कोटी रुपयांच्या कोकेनसह (Cocaine) अटक करून ताब्यात घेण्यात आले आहे. त्या महिलेने केसांच्या विगमध्ये आणि अंतर्वस्त्रात कोकेन लपवले होते. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्याने महिलेला ताब्यात घेतल्यानंतर बुधवारी ही माहिती देण्यात आली. एका विशिष्ट माहितीवर कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (Directorate of Revenue Intelligence) मुंबई प्रादेशिक विभागाने मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापळा रचून युगांडाच्या महिला प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. ही महिला एंटेबेहून नैरोबीमार्गे मुंबईत पोहोचली होती.

ADVERTISEMENT

विग आणि अंतर्वस्त्राचा वापर

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी प्रथम युगांडाच्या महिलेची तपासणी चालू केल्यानंतर पहिल्यांदा त्यांना काही आढळून आले नाही. त्यानंतर अधिकाऱ्यांना संशय आल्यानंतर त्यांनी महिलेचा विग आणि तिच्या अंतर्वस्त्रात कोकेन लपवल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यावेळी 890 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले.

हे ही वाचा >> CM एकनाथ शिंदे म्हणाले ठाकरे एक नंबरचे मुख्यमंत्री आहेत, पण…

वेगळ्या पर्यायाची निवड

या प्रकरणी माहिती देताना त्यांनी सांगितले की, युगांडाच्या महिलेने कोकेनची तस्करी करण्यासाठी वेगळ्या पर्यायाची निवड करून त्या आधारे कोकेनच्या तस्करीसाठी प्रयत्न करत होती. त्या महिलेकडे कोकेन आढळल्यानंतर महिलेची चौकशी करून तिला अटक करण्यात आले आहे.

हे वाचलं का?

अधिकाऱ्यांना बसला धक्का

युगांडाच्या महिलेने कोकेन तस्करीसाठी तिच्या विग आणि अंतर्वस्त्रांचा केलेला वापर पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला आहे. कारण तिने ज्या पद्धतीने कोकेन लपवून ठेवले होते, त्यामुळे पोलिसही चक्रावले होते. मात्र चौकशी आणि कसून तपास चालू केल्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आला.

युगांडाची आणखी एक महिला ताब्यात

गेल्या काही दिवसांतील ही मोठी कारवाई असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी युगांडामधीलच एका महिलेकडूनही कोट्यवधी रुपयांचे कोकेन जप्त करून तिला ताब्यात घेण्यात आले होते. युगांडातील महिलेने विग आणि अंतर्वस्त्रातून कोकेन आणून त्याची तस्करी करण्याचा प्रयत्न तिने केला होता. आता तिला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणात आणखी कोणी आहे का त्याचा तपासही चालू आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> धक्कादायक ! 7 महिन्यात 4 हजार 872 नवजात बालकं दगावली, दररोजचा आकडा तर…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT