Crime : लग्नाच्या पहिल्याच रात्री घात, खिरीमध्ये गुंगीचे औषध मिसळून…लग्नघरात काय घडलं?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

uttar pradesh crime two bride robbery ran away after four hour marrige hardoi story
uttar pradesh crime two bride robbery ran away after four hour marrige hardoi story
social share
google news

Uttar Pradesh Crime  News : लग्न करणे ही काय साधीसुधी गोष्ट नव्हे. त्यासाठी समोरच्या व्यक्तीची पडताळणी करणे खुप गरजेचे आहे. जर ती पडताळणी केली नाही तर उत्तर प्रदेशच्या या घटनेप्रमाणे गत होते. या घटनेत दोन सख्ख्या भावांच लग्न सख्ख्या बहिणींशी जुळलं आणि ठरल्याप्रमाणे लग्नही पार पडलं. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री मोठा घात झाला. दोन्ही बहिणींनी मिळून प्लान रचला शिताफीने सासरच्या कुटुंबियांना लुटुन पोबारा केला. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. (uttar pradesh crime two bride robbery ran away after four hour marriage hardoi story)

ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये ही घटना घडली आहे. हरदोईच्या भडायल गावात राहणाऱ्या नरेश पाल यांना प्रदीप (30) आणि कुलदीप ( 27) नावाची दोन मुले आहेत. या दोन्ही मुलांची काही केल्या लग्न जमत नव्हती. त्यामुळे कुटुंब खुप नाराज होते. या दरम्यान प्रदीप दिल्लीत त्याच्या गावातील एका व्यक्तीच्या संपर्कात आला. या व्यक्तीला प्रदीपला लग्न जमत नसल्याची समस्या सांगितली.

हे ही वाचा : “मकाऊ की रातें”, संजय राऊतांनी शेअर केला बावनकुळे थांबलेल्या कॅसिनोतील व्हिडीओ

प्रदीप आणि इकबालचे फोनवर बोलणे झाले होते. यावेळी इकबालने लग्न जुळवून देण्याच्या बदल्यान 80 हजार रूपयांची मागणी केली होती. मात्र काही कारणास्तव त्याच्यांत हा व्यवहारच झाला. या व्यवहारापूर्वीच इक्बालने त्याच्या काही ओळखींच्याकडे या दोन्ही मुलांचे फोटो आणि त्यांच्या आई-वडिलांचा नंबर पाठवला होता.

हे वाचलं का?

त्यामुळे प्रदीपची आई शिवकन्या यांच्या फोनवर एक कॉल आला. हा कॉल करणारा व्यक्ती रवि ऊर्फ राजकूमार होता.या रविने प्रदीपचे लग्न जुळवून देण्याचे आश्वासन दिले.पण शिवकन्या यांनी दुसऱ्या मुलाचेही लग्न जुळवण्याचा त्याच्यासमोर प्रस्ताव ठेवला. यावर रविने लखीमपूर मधल्या दोन सख्ख्या बहिणींची माहिती दिली. आणि हे लग्न जुळवण्यासाठी 80 हजाराची मागणी केली. शिवकन्या यांनी याला होकार दिला.

लग्न जमल्याने कुटुबियांनी देखील दागदागिने बनवून घेतले. त्यानंतर लग्नाच्या दिवशी रवि दोन्ही बहिणींना घेऊन गावात आला आणि तिथल्या मंदिरात त्याने त्यांचे लग्न लावून दिले. लग्नानंतर दोन्ही जोडपे घरात पोहोचली. यावेळी लग्नाच्या पहिल्याच रात्री दोन्ही बहिणींनी मिळून सासरच्या कुटुंबियांसाठी खीर बनवली. या खीरीत त्यांनी गुंगीचे औषध मिसळून संपूर्ण कुटुंबाला बेशूद्ध केले होते. ही खीर खाऊन संपूर्ण कुटुंब गाढ झोपी गेले होते. त्यानंतर दोन्ही बहिणींनी मिळून घरातील दागदागिने आणि रोख रक्कम घेऊन घरातून पोबारा केला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Mohammed Shami : “देशाचा जबाबदार माणूस…”, मोदींसोबत त्या भेटीबद्दल शमी काय म्हणाला?

सकाळी हे कुटुंब उठल्यावर त्यांना घऱात चोरी झाल्याचे समजले.या चोरीसोबत दोन्ही बहिणी देखील गायब होत्या. त्यामुळे या दोन्ही बहिणींनीच आपल्याला गंडा घातल्याचे कुटुंबियांना कळून चुकले. या प्रकरणी आता कुटुंबियांनी दोन बहिणींविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर घटनेचा तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT