ज्या मुलांना आईसारखी माया दिली, त्यांनीच केला घात, वडिलांची निर्घृण हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Uttrakhand father Murder retired ITBP father was brutally murdered by two daughters and a son
Uttrakhand father Murder retired ITBP father was brutally murdered by two daughters and a son
social share
google news

Father Murder: उत्तराखंडमधील (Uttarakhand) अल्मोडा येथील लमगाडा भागातील भागदेवालीमध्ये ज्या मुलांना एका बापाने त्यांच्या आईशिवाय वाढवले. आईचा मृत्यू होऊन ज्या बापाने कधी त्यांना आईची (Mother) आठवण येऊ दिली नाही. त्याच बापाच्या मुलांनी वडिलांची निर्घृणपणे हत्या (Murder) केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ज्या बापाने आईची माया देऊन वाढवले होते, त्याच बापाच्या जीवावर मुलं उठल्याने अनेकांना धक्का बसला आहे.(Uttrakhand father Murder retired ITBP father was brutally murdered by two daughters and a son)

ADVERTISEMENT

बापाशिवाय मुलं वाढवली

सुंदर लाल यांच्या मृत्यू झाल्यानंतर त्यांचा लहान भाऊ ओम प्रकाश हे सांगतात की, सुंदर लालची मुलं जेव्हा लहान होती. त्यावेळी त्यांची पत्नी गीता देवी यांनी मुलांना त्यांच्यासोबत फिरवत त्यांना वाढवले. कधी गीता देवींनी नवऱ्याशिवाय मुलांचा सांभाळ केला पण त्यांनी कधी तक्रार केली नाही. हे सगळं करत असतान नऊ वर्षापूर्वी गीता देवी आजारी पडल्या होत्या.

हे ही वाचा >> Crime : गन पॉईंटवर केलं नग्न, बलात्कार करून…, विद्यार्थीनींसोबत काय घडलं?

पत्नीचा मृत्यूनंतरही सांभाळ

गीता देवी यांना कावीळ झाली होती, त्यावेळी सुंदर लाल नोकरी करत होते. मात्र त्या आजारपणातच गीता देवी यांचा मृत्यू झाला आणि त्यांनी आपली मुलं डेहराडूनमध्ये ठेवली. आयटीबीपीची नोकरी असल्याने त्यांनी सरकारी क्वार्टरमध्ये मुलांना ठेवले आणि त्यांना शिक्षणही चांगले दिले. त्यांनी नोकरीही केली पण त्यांनी मुलांना कधी त्यांच्या आईची आठवण येऊ दिली नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुलंच बनली वैरी

आयटीबीपीची नोकरी असल्याने त्यांची ड्युटीही वेगवेगळ्या ठिकाणी लागायची. ड्युटी कितीही लांब असली तरी त्यांनी मुलांची काळजी घेण्याकडे कधी दुर्लक्ष केले नाही. नोकरीच्या उत्तराधार्त त्यांना लडाखमध्ये पोस्टिंग मिळाली होती. मुलांपासून किती तरी किलो मीटर दूर जाऊनही त्यांनी मुलांच्याबाबत कधीही हलगर्जीपणा केला नाही. पण त्यांना हे माहिती नव्हतं की, भविष्यात कधी तरी हीच मुलं आपली वैरी बनतील.

पैशासाठी टोकाचा वाद

सुंदर लाल यांच्या हत्येचा तपास करताना पोलिसांना समजले की, वडिलांची हत्या करण्यामागे आर्थिक टंचाई ही पण एक समस्या होती. पोलीस म्हणतात सुंदर लाल यांच्या डिंपल आणि हृतिक या दोघांनी डेहराडूनमध्ये उच्च शिक्षण घेऊनही त्यांना स्वतःचा खर्च त्यांना झेपत नव्हता. त्यामुळे त्यांनी नेहमीच वडिलांकडे सतत पैशांची मागणी केली. त्यांची मोठी मुलगी तर त्यांच्या खात्यावर आलेले सगळे पैसे एकरकमी ती आपल्या खात्यावर टाकायला बघायची. त्यासाठी ती कधी कधी वडिलांवर दबावही आणत होती.

ADVERTISEMENT

लहान बहिणीची पूस

सुंदर लाल निवृत्त झाल्यानंतर ते आपल्या गावात राहायला आले. त्यावेळी त्यांच्या लहान मुलीला मोठी बहीण आणि भावाबरोबर राहण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. त्यामुळे लहान बहिणीलाही मोठ्या बहीण-भावावरच अवलंबून राहावे लागत होते. त्या लहान बहिणीनेच मग पैशासाठी मोठ्या बहीण आणि भावाला भडकावायला सुरुवात केली. मात्र ज्यावेळी वडिलांची हत्या झाली त्यावेळी तिला हे माहिती नव्हतं की, वडिलांच्या हत्येमध्ये तीही एक सहआरोपी असेल.

ADVERTISEMENT

मुलं उच्चशिक्षित

ज्या बापाने रक्ताचे पाणी करून मुलांना वाढवले होते, त्या वडिलांची हत्या करणारी त्यांची दोन्ही मुलं ही उच्च शिक्षित आहेत. त्यांची मोठी मुलगी डिंपल ही पीएचडी धारक आहे. तिने तिच्या बॉयफ्रेंडची मदत घेऊनच वडिलांच्या हत्येचा कट रचला होता. तर ज्या भावाने तिला मदत केली तोही एमकॉम आहे. वडिलांच्या हत्या केल्यामुळे ही दोन्ही उच्चशिक्षित मुलं आता तुरुंगात गेली आहेत.

हे ही वाचा >> 1 तारखेपासून होणार ‘हे’ 5 मोठे बदल, नेमका काय होणार परिणाम

    follow whatsapp

    ADVERTISEMENT