Walmik Karad: वाल्मिक कराडला तुरुंगात 24 तास हवा 'हा' व्यक्ती, कारण 'ती' मशीन...

मुंबई तक

Walmik Karad sleep apnea: वाल्मिक कराड याने वैद्यकीय गोष्टींचा हवाला देत तुरुंगात 24 तास सहाय्यकाची मागणी केली आहे. यासाठी त्याने कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे.

ADVERTISEMENT

वाल्मिक कराडला तुरुंगात 24 तास हवा 'हा' व्यक्ती
वाल्मिक कराडला तुरुंगात 24 तास हवा 'हा' व्यक्ती
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वाल्मिक कराडने कोर्टात दाखल केली याचिका

point

पाहा वाल्मिक कराडने कोणती मागणी केली

point

वाल्मिक कराडला तुरुंगात 24 तास सहाय्यक का हवा?

बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीच्या कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडबाबत आता एक नवी माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड याने आता केज न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्याने त्याच्या सहाय्यकाला 24 तास सोबत ठेवण्याची मागणी केली आहे. त्याने यासाठी त्याच्या वैद्यकीय स्थितीचा हवाला दिला आहे. याबाबतचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

'तुरुंगात 24 तास सहाय्यक द्या', वाल्मिक कराडची भलतीच मागणी 

प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात कराड यांनी सांगितले की, त्याला स्लीप एपनियाचा त्रास आहे. ज्यासाठी त्याला तुरुंगात ऑटो CPAP (continuous positive airway pressure)उपकरण देण्यात आले आहे. पण त्याने असी मागणी केली आहे की, मशीन चालवण्यासाठी त्याला एका सहाय्यकाची 24 तास गरज आहे.

हे ही वाचा>> 'धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा?', राधाकृष्ण विखे-पाटलांचं चक्रावून टाकणारं उत्तर

दरम्यान, कोर्टाने या संदर्भात सध्या या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीआयडीला नोटीस बजावली आहे. तथापि, सीआयडी अधिकाऱ्यांनी या याचिकेबाबत बोलताना सांगितलं की, 'अशा प्रकारच्या विनंतीसाठी कोणतीही तरतूद नाही. या कारणास्तव या याचिकेला विरोध करण्यात येईल.'

त्याची वैद्यकीय स्थिती आणि वैद्यकीय उपकरणांसाठी तांत्रिक सहाय्याची आवश्यकता असल्याचे कारण देत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. 31 डिसेंबर रोजी अटक करण्यात आलेल्या कराडला 14 जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

कराड याच्यावतीने अर्ज करताना त्यांचे वकील अशोक कवाडे म्हणाले की, 'कराड यांना स्लीप ॲप्नियाचा त्रास आहे. त्यांची वैद्यकीय स्थिती लक्षात घेता ऑटो सीपीएपी मशीन आवश्यक आहे, जे त्याला चेस्ट फिजिशीयन आणि स्लीप स्पेशालिस्ट यांच्या सांगण्यानुसार देण्यात आले आहे.'

हे ही वाचा>> Santosh Deshmukh Murder Case: धनंजय मुंडे राजीनाम्याबाबत पहिल्यांदाच बोलले, पण वाल्मिक कराडचं नावंही..

कराडच्या अर्जात असे नमूद केले आहे की, 'मशीन विशिष्ट दबाव सेटिंग्ज अंतर्गत ऑपरेट करणे आवश्यक आहे, ज्याचे व्यवस्थापन करण्यासाठी त्याचा सहाय्यक रोहित कांबळे याला प्रशिक्षण देण्यात आले आहे. रोहित कांबळे कराडला दररोज मशिनच्या सहाय्याने मदत करतो. जर ते यंत्र चुकीचे सेट केले असेल, तर ते झोपेत असताना ते त्याच्यासाठी घातक ठरू शकते,' असे अर्जात म्हटले आहे.

या याचिकेत पुढे म्हटले आहे की, स्लीप एपनियामुळे झोपेच्या वेळी श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. ऑटो सीपीएपी मशीन वायुमार्गाचा दाब राखून अखंड श्वासोच्छवासाची खात्री देते.

मात्र, अटकेत असलेल्या आरोपीसोबत स्वीय सहाय्यकाला परवानगी देण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे सीआयडी अधिकाऱ्यांनी सांगितले. "आम्ही आमचा आक्षेप नोंदवू कारण कायदा पोलीस कोठडीमध्ये अशा व्यवस्थेस परवानगी देत नाही," असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

न्यायालयाने या याचिकेबाबत नोटीस बजावली असून सीआयडीकडून उत्तर मागितले आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी कोर्ट दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून घेईल. कराड यांची वैद्यकीय प्रकृती गंभीर आहे की नाही यावर न्यायालयाचा निर्णय अवलंबून असेल असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp