Walmik Karad: वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टाबाहेर तुफान राडा, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Walmik Karad Latest News Update:  बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आलीय. कराडला बीडच्या जिल्हा न्यायालयात हजर केले.

ADVERTISEMENT

Walmik Karad Police Custody Till 22 January
Walmik Karad Police Custody Till 22 January
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वाल्मिक कराडला बीड जिल्हा न्यायालयात हजर केले

point

वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी

point

वाल्मिक कराड समर्थक आणि विरोधकांमध्ये झाला राडा

Walmik Karad Latest News Update:  बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आलीय. कराडला बीडच्या जिल्हा न्यायालयात हजर केले. दोन्ही बाजूंनी युक्तीवाद झाल्यानंतर वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याचदरम्यान न्यायालयाबाहेर मोठा राडा झाल्यानं एकच खळबळ उडाली. वाल्मिक कराडचे समर्थक आणि विरोधक यांच्यात राडा झाला.  विरोधकांनी कराडच्या फोटोला चपलांचा मार देत फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. तर दुसरीकडे कराड समर्थकांनी न्या द्या..न्याय द्या..वाल्मिक कराडला न्याय द्या, अशी घोषणाबाजी करत आंदोलन केलं. 

न्यायालयाबाहेर कराड समर्थक आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी परळी राष्ट्रीय महामार्गावर वाल्मिक कराडच्या महिला समर्थकांनी झोपून आंदोलन केलं. कराडला न्याय मिळवून देण्यासाठी समर्थक महिलांनी तपास यंत्रणेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. काल मंगळवारी कराड समर्थकांनी आत्मदहनाचा प्रयत्नही केला होता. 

हे ही वाचा >> Suresh Dhas : जातीवाद नाही, हा 4-5 टक्के लोकांचा गुंडाडवाद... परळीतील राड्यावर काय म्हणाले सुरेश धस?

दरम्यान, वाल्मिक कराड यांच्या बाजूने घोषणाबाजी करणाऱ्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला. पोलिसांची दादागिरी चालणार नाही, अशा घोषणा कराडच्या समर्थकांनी दिल्या. खोटे गुन्हे मागे घ्या, देशमुखांना न्याय हवा, पण अण्णांवर अन्याय नको, अशाप्रकारच्या घोषणाही वाल्मिक कराड समर्थकांनी दिल्या. कोर्टाबाहेर राडा झाला त्यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कराड समर्थक आक्रमक झाल्यानंतर पोलिसांना त्यांच्यावर लाठीचार्ज करावा लागला. तर दुसरीकडे पांगरीतही कराड समर्थकांनी रस्त्यावर उतरून टायर्स जाळून प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.

हे ही वाचा >> 'वाल्मिक कराडने खुनाच्या दिवशी देशमुखांना दिलेली धमकी..' कोर्टात प्रचंड खळबळजनक दावा


हे वाचलं का?

    follow whatsapp