बीडमध्ये हे चाललंय तरी काय? वाल्मिक कराडच्या बातम्या पाहणाऱ्या तरुणाला तुफान मारहाण

मुंबई तक

वाल्मिक कराड याच्याशी संबंधित बातम्या पाहणाऱ्या बीड जिल्ह्यातील एका तरुणाला त्यांच्याच गावातील दोन तरुणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

वाल्मिक कराडच्या बातम्या पाहणाऱ्या तरुणाला तुफान मारहाण
वाल्मिक कराडच्या बातम्या पाहणाऱ्या तरुणाला तुफान मारहाण
social share
google news

योगेश काशिद, बीड: बीड जिल्ह्यातील परिस्थिती ही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील गुन्हेगारी आणि तेथील काळे धंदे याबाबत अनेक गोष्टी नव्याने समोर आल्या आहेत. त्यातच मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांच्या अटकेनंतर या सगळ्या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. असं असताना एका चक्क केवळ वाल्मिक कराडसंबंधी बातम्या पाहणाऱ्या एका तरुणाला गंभीर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

बीड जिल्ह्यातील धारूर येथे वाल्मिक कराड याच्या संबंधित बातम्या पाहिल्याने एका तरुणाला गंभीर मारहाण करण्यात आली आहे. जखमी तरुणावर सध्या अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा>> 'इथे बाप बसलेले आहेत आपण...', वाल्मिक कराडची PSI सोबतची Audio Clip व्हायरल

नेमकं प्रकरण काय? 

अशोक शंकर मोहिते आपल्या मोबाइलवर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बातम्या पाहत होता. यादरम्यान वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघं तिथे आले आणि त्यांनी थेट अशोकला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.  या दोघांनी 'आमच्या बातम्या का पाहतोस.. लय माजलेत यांच्याकडे बघावे लागेल..' असं म्हणत थेट अशोकला लाथा बुक्क्याने मारहाण केली.

हे ही वाचा>> Walmik Karad CCTV Video : खंडणी मागितली त्यादिवशी सगळे आरोपी एकत्र? CCTV ने उडवली खळबळ

'तू येथून पुढे जर मुंडे साहेबांच्या आणि वाल्मिक अण्णाच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख करू.' अशी धमकी या दोघांनी दिल्याचा आता आरोप करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या मारहाणीतील आरोपी हे संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेल्या कृष्णा आंधळे या मुख्य आरोपीचे मित्र असल्याचे समजते आहे. कारण त्यांनी कृष्णा आंधळे याच्या समर्थनार्थ WhatsApp वर स्टेट्स देखील ठेवले आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात दोन समाजांमधील तणाव हा दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या गोष्टींना वेळीच आवर घालण्याचं मोठं आव्हान पोलीस प्रशासन आणि सरकार समोर आहे. 

संतोष देशमुखांची का करण्यात आली हत्या?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करुन अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. कारण ते तिथे पवनचक्की प्रकल्प चालवणाऱ्या ऊर्जा कंपनीविरुद्ध खंडणीचा प्रयत्न थांबवण्याचा प्रयत्न करत होते. असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.

धनंजय मुंडे हे परळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत आणि वाल्मिक कराडशी त्यांच्या असलेल्या निकटच्या संबंधांमुळे सत्ताधारी आघाडीतील काही मित्रपक्ष आणि विरोधी पक्षांकडून त्यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp