Worli Accident : मिहीर शाहाने दारू प्यायली होती का? बार मालकाने काय सांगितलं?
Worli hit and run case : अपघाताच्या आदल्या रात्री मिहीर शाहने बारमध्ये पार्टी केली होती. तब्बल 18 हजार 730 रुपये त्यांनी बारमध्ये उडवले होते. त्यामुळे मिहीरकडून दारूच्या नशेत ही अपघाताची घटना घडली होती का? याचा पोलीस तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
Worli hit and run case Update : वरळी हिट अँड रन प्रकरणात सध्या आरोपी मिहीर शाह फरार आहे. त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर आहेत. या प्रकरणात अपघाताच्या आदल्या रात्री मिहीर शाहने (Mihir Shah) बारमध्ये पार्टी केली होती. तब्बल 18 हजार 730 रुपये त्यांनी बारमध्ये उडवले होते. त्यामुळे मिहीरकडून दारूच्या नशेत ही अपघाताची घटना घडली होती का? याचा पोलीस तपास करत आहेत. त्यात आता बार मालकाने याबाबत मोठी माहिती दिली आहे.(worli hit and run case did mihir shah drink alcohol? bar owner says rajen shah shiv sena eknath shinde)
ADVERTISEMENT
वरळीतील अपघातापुर्वी मिहीर शाह वाइस ग्लोबल तपास या बारमध्ये बसला होता. या बारचे मालक करण शाह यांनी सांगितले की, मिहीर शाह काल रात्री 11 वाजून 8 मिनिटाच्या दरम्यान चार मित्रांसोबत मर्सिडीज कारने आला होता. या दरम्यान त्यांच्यासोबत एकही मुलगी नव्हती. बारमध्ये या मित्रांनी जेवण आणि दारू प्यायले होते. यामध्ये मिहीरने दारू प्यायली नव्हती, त्याने रेडबुल घेतली होती, अशी मोठी माहिती करण शाह यांनी दिली आहे.
हे ही वाचा : Raju Shinde : ठाकरेंचा भाजपला मोठा झटका! शिंदेंमुळे कुणाची जागा धोक्यात?
बारमध्ये त्यांनी 18 हजार 730 रूपयांचं बिल केलं होतं. हे बिल त्यांच्या मित्राने भरले होते.विशेष म्हणजे हे चारही मित्र मर्सिडीजने आले होते आणि मर्सिडीजनेच गेले होते. आणि अपघात हा बीएमडबल्यु गाडीने झाल्याचे करण शाह यांनी सांगितले. रात्री 1 वाजून 40 मिनिटाने हे तरूण गेल्याचे बार मालकाने सांगितले. पोलिसांनी देखील या बारची चौकशी केली आहे. या बारमधील सीसीटीव्ही फुटेजही तपासासाठी ताब्यात घेतले आहेत.
हे वाचलं का?
घटनाक्रम काय?
मुंबईच्या वरळी भागात रविवारी हिट अॅण्ड रनची घटना घडली होती. बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली होती. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला होता. ज्या बीएमडब्ल्यू कारने धडक दिली, त्या गाडीत शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह आणि चालक होता. या घटनेनंतर दोघेही फरार आहेत. त्यामुळे चौकशीसाठी राजेश शाह यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वरळीतील अॅटरिया मॉलजवळ ही घटना घडली. वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे कावेरी नाकवा या पतीसोबत सकाळी मासे लिलावासाठी ससून डॉकला गेल्या होत्या. मासे घेऊन दुचाकीवरून परत येत असताना नाकवा दाम्पत्याच्या दुचाकीला कारने धडक दिली. गाडीवर भरपूर ओझे असल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दोघेही पती पत्नी बीएमडब्ल्यू कारच्या बोनेटवर आदळले होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Worli Hit and Run प्रकरणामुळे चर्चेत आलेले शिंदेंच्या शिवसेनेचे राजेश शाह कोण?
या दरम्यान पतीने प्रसंगावधान दाखवत लगेच गाडीच्या बाजूला उडी मारली. मात्र महिलेला बाजूला होता आले नाही. त्यातच घाबरलेल्या चालकाने गाडी जोरात पळवली. त्यामुळे बोनेटवर पडलेली महिला दुचाकीसह दूरपर्यंत फरफटत नेली. यात महिला गंभीर जखमी झाली. महिलेला मुंबईतील नायर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.
ADVERTISEMENT
दरम्यान या प्रकरणात राजेश शाह यांचा मुलगा आणि चालक दोघेही फरार आहेत. त्यामुळे पोलिसांनी राजेश शाह यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT