Worli Hit And Run Case : मिहीर शाहच्या गर्लफ्रेंडला पोलिसांनी घेतले ताब्यात, कारण...
Worli Hit And Run Case Update : वरळी हिट अँड रन प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातही कायद्याचे पालन केले जाईल.
ADVERTISEMENT
Worli Hit And Run Case Update : मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी आरोपी मिहीर शाह याचे वडील आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचे उपनेते राजेश शाह (Rajesh Shah) यांना आणि ड्रायव्हर राजर्षि बिदावत याला ताब्यात घेतले आहे. या दोघांनंतर आता पोलिसांनी मिहीर शाहच्या (Mihir Shah) गर्लफ्रेंडलाही ताब्यात घेतले आहे. त्यामुळे पोलिसांनी गर्लफ्रेंडला ताब्यात घेण्यामागचं कारण काय आहे? हे जाणून घेऊयात. (worli hit and run case mihir shah girlfriend wad detained police rajesh shah father and driver inquiry mumbai police)
ADVERTISEMENT
खरं तर ज्यावेळेस वरळी हिट अँड रन प्रकरण घडलं. या घटनेनंतर आरोपी मिहीर शाहने घटनास्थळावरून पळ काढला होता.या दरम्यान तो आपल्या गर्लफ्रेंडच्या घरी गेल्याची देखील सुत्रांकडून माहिती मिळत आहे. गर्लफ्रेंडच्या घरी काही तास घालावल्यानंतर तो तेथून निघाला होता. यावेळी त्याने त्याचा फोन देखील स्विचऑफ केला होता. त्यामुळे आता पोलिसांनी चौकशीसाठी मिहीरच्या गर्लफ्रेंडला ताब्यात घेतले आहे. या चौकशीतून आता काय उलगडा होतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा : Worli Hit and Run प्रकरणामुळे चर्चेत आलेले शिंदेंच्या शिवसेनेचे राजेश शाह कोण?
दरम्यान अपघाताच्या वेळी कारमध्ये दोन जण होते. गाडी कोण चालवत होती, याचा तपास करत आहोत. सध्या राजर्षि आणि राजेश शहा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी दारूच्या नशेत गाडी चालवत होता का? या दृष्टिकोनातूनही पोलीस तपास करत आहेत. अपघातानंतर आरोपी कार कलानगरमध्ये सोडून निघून गेल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. पोलिसांनी बीएनएस आणि मोटार वाहन कायद्याची कलमे जोडली आहेत, अशी माहिती डीसीपी झोन कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली.
हे वाचलं का?
या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातही कायद्याचे पालन केले जाईल. अपघातात सहभागी असलेली व्यक्ती शिवसेनेच्या एका नेत्याचा मुलगा आहे का, असे विचारले असता, शिंदे म्हणाले की, कायदा सर्वांसाठी समान असून सरकार प्रत्येक प्रकरणाकडे एकाच दृष्टिकोनातून पाहते.या अपघातासाठी वेगळे नियम असणार नाहीत. कायद्यानुसार सर्व काही केले जाईल. पोलीस कोणालाही वाचवणार नाहीत. मुंबईतील दुर्घटना दुर्दैवी असून, मी पोलिसांना कठोर कारवाई करण्यास सांगितल्याचे देखील शिंदे यांनी सांगितले आहे.
नेमकी घटना काय?
मुंबईच्या वरळी भागात रविवारी हिट अॅण्ड रनची घटना घडली होती. बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली होती. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला होता. ज्या बीएमडब्ल्यू कारने धडक दिली, त्या गाडीत शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह आणि चालक होता. या घटनेनंतर दोघेही फरार आहेत. त्यामुळे चौकशीसाठी राजेश शाह यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Worli Accident : "माझी बायको चाकाखाली, तो...", पती ढसाढसा रडला, सांगितलं काय घडलं?
वरळीतील अॅटरिया मॉलजवळ ही घटना घडली. वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे कावेरी नाकवा या पतीसोबत सकाळी मासे लिलावासाठी ससून डॉकला गेल्या होत्या. मासे घेऊन दुचाकीवरून परत येत असताना नाकवा दाम्पत्याच्या दुचाकीला कारने धडक दिली. गाडीवर भरपूर ओझे असल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दोघेही पती पत्नी बीएमडब्ल्यू कारच्या बोनेटवर आदळले होते.
या दरम्यान पतीने प्रसंगावधान दाखवत लगेच गाडीच्या बाजूला उडी मारली. मात्र महिलेला बाजूला होता आले नाही. त्यातच घाबरलेल्या चालकाने गाडी जोरात पळवली. त्यामुळे बोनेटवर पडलेली महिला दुचाकीसह दूरपर्यंत फरफटत नेली. यात महिला गंभीर जखमी झाली. महिलेला मुंबईतील नायर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.
ADVERTISEMENT
दरम्यान या प्रकरणात राजेश शाह यांचा मुलगा आणि चालक दोघेही फरार आहेत. त्यामुळे पोलिसांनी राजेश शाह यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT