Yashshree shinde : यशश्रीच्या मृतदेहाचे कुत्रे तोडत होते लचके; पोलीस पोहोचले त्यावेळी काय दिसलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

yashshree shinde murder case update dog bite on girl body uran accused dawood absconding shocking crime story
यशश्री शिंदेच्या हत्या प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

यशश्री शिंदेच्या हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

point

यशश्रीच्या चेहऱ्यावर,शरीरावर आणि गुप्तांगावर धारदार शास्त्राने वार

point

आई-वडिलांचा दाऊद शेख नामक व्यक्तीवर संशय

Navi Mumbai Murder Case : नवी मुंबईच्या उरण गावातील 20 वर्षीय यशश्री शिंदेच्या हत्या प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आरोपीने यशश्रीच्या चेहऱ्यावर,शरीरावर आणि गुप्तांगावर धारदार शास्त्राने वार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या हत्येनंतर ज्या अवस्थेत यशश्रीचा मृतदेह सापडला होता. ते पाहून पोलिसांनाच घाम फुटला होता. इतकंच नाही तर मृतदेह पोलिसांच्या हाती लागेपर्यंत कुत्र्यांनी तिच्या शरीराचे अक्षरश लचके तोडले होते. (yashshree shinde murder case update dog bite on girl body uran accused dawood absconding shocking crime story) 

यशश्री शिंदे तिच्या कुटुंबासह उरण येथे राहत होती आणि बेलापूरमधील एका कंपनीत काम करायची. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे यशश्री घरातून कामावर निघाली होती, मात्र ती परतलीच नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तिची शोधा शोध सुरू केली,मात्र ती काही सापडली नाही. शेवटी कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठून यशश्री बेपत्ता झाल्याची तक्रार केली. या तक्रारीनंतर यशश्रीच्या तपासाला सुरूवात झाली. 

हे ही वाचा : Paris Olympic 2024 : मनू भाकरने रचला इतिहास, नेमबाजीत भारताला मिळवून दिलं कांस्य पदक

दरम्यान शुक्रवारी रात्री उरण पोलीस स्टेशनच्या पथकाला एक कॉल आला होता. त्यात कोटनाका परिसरात रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात मुलीचा मृतदेह पडला असून कुत्रे तिच्या शरीराचा चावा घेत होते. कुत्र्यांमुळे मुलीचा चेहरा विद्रुप झाला होता. तिच्या मासं देखील कुत्र्यांने खाल्ले होते. तिच्या चेहऱ्यावर,शरीरावर आणि गुप्तांगावर वार होते. या प्रकरणी यशश्री बेपत्ता प्रकरण पाहता तिच्या कुटुंबियांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळेस यशश्रीच्या अंगावरील कपडे आणि टॅटूवरून तिची ओळख पटवली होती. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2019 ला शारीरीक शोषण

दरम्यान या प्रकरणात यशश्रीच्या आई-वडिलांनी दाऊद शेख नामक व्यक्तीवर संशय असल्याची माहिती दिली होती. कारण व्यवसायाने ड्रायव्हर असलेल्या दाऊदने 2019 मध्ये यशश्रीचे शारीरीक शोषण केले होते. या घटनेनंतर कुटुंबियांनी दाऊद विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून तुरूंगवास घडवला होता. 

बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगून आल्यानंतक दाऊदने पुन्हा यशश्रीचा पाठलाग करायला सुरुवात केली होती. त्यामुळे दाऊदने तिचे अपहरण करून हत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Guru Waghamare : मांडीवर 22 शत्रूंची गोंदवली नावं, पण गर्लफ्रेंडनेच काढला काटा, Inside Story

दरम्यान आरोपी हा मुळचा कर्नाटकचा रहिवासी असून त्याचा मोबाईल बंद आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी सात पथके नेमली आहेत. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही आहे. त्यामुळे नागरीकांकडून निषेध नोंदवत संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने सध्या नवी मुंबई हादरली आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT