Kota : ‘सॉरी, हॅप्पी बर्थडे पापा…’; पॉलिथीन बॅग तोंडाला बांधून घेतला स्वतःचा जीव
मनजोत छाबरा असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे वय 18 वर्षे आहे. NEET च्या तयारीसाठी तो कोटाला आला होता.
ADVERTISEMENT
Student Suicide : ‘सॉरी, मी जे काही केले आहे, ते मी माझ्या स्वेच्छेने केले आहे. त्यामुळे कृपया माझ्या मित्रांना आणि पालकांना त्रास देऊ नका. वाढदिवसाच्या शुभेच्छा पापा…’, राजस्थानच्या कोटा येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या या गोष्टी हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत, ज्याने आपल्या वडिलांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मृत्यूला कवटाळले. मनजोत सिंग हा विद्यार्थी उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील रहिवासी होता. डॉक्टर होण्यासाठी तो कोटा येथे तयारी करत होता. जानेवारीपासून आतापर्यंत कोटामध्ये 19 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. (suicide note of a student studying in Rajasthan’s Kota are heart-wrenching, who embraced death after wishing his father’s birthday.)
ADVERTISEMENT
मनजोत 18 वर्षांचा होता. एप्रिल महिन्यात त्याने कोटा गाठले. त्याच्या आत्महत्येची माहिती पोलिसांना मिळताच ते मनजोतच्या वसतिगृहात पोहोचले. त्यावेळी खोलीला आतून कुलूप होते. मनजोतच्या तोंडाला पॉलिथीन बॅग बांधलेली होती आणि हात मागे बांधले होते.
‘तोंडावर पॉलिथीन आणि हातात दोरी बांधलेली’
विद्यार्थी मनजोतला पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या करता आली नाही. तेव्हा त्याने प्रथम आपले डोके व तोंड पॉलिथिनने झाकून घेतले. त्याचबरोबर श्वास घेता येऊ नये म्हणून त्याने गळ्यातील पॉलिथीन दोरीने बांधले. त्यानंतर दोन्ही हात दोरीने बांधून तो बेडवर झोपला. त्यामुळे त्याला नीट श्वास घेता येत नव्हता. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
हे वाचलं का?
वाचा >> रत्नागिरी : रत्नागिरी : बँकेतून निघाली पण…, आधी गँगरेप नंतर… मृतदेह बघून पोलिसांही ‘शॉक’ – Mumbai Tak
मनजोतच्या खोलीत सुसाईड नोटही सापडली आहे. यामध्ये त्याने माझ्या कुटुंबीयांना आणि माझ्या मित्रांना त्रास देऊ नये, असे लिहिले आहे. मी हे माझ्या स्वेच्छेने करत आहे. यासोबतच विद्यार्थ्याने ‘हॅपी बर्थडे पापा’ असेही लिहिले आहे.
पोलीस पाहताहेत कुटुंबाची वाट
पॉलिथिनने डोके व तोंड बांधून विद्यार्थ्याने ज्या प्रकारे आत्महत्या केली, त्यामुळे पोलिसांनीही मृतदेह शवागारात नेला नाही. पोलीस आता मनजोतचं कुटुंब येण्याची वाट पाहत आहे. कुटुंबीय आल्यानंतरच वसतिगृहाच्या खोलीतून मृतदेह शवागारात नेण्यात येईल. पोलिसांनी घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली आहे. या घटनेचे संपूर्ण कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ADVERTISEMENT
या घटनेबाबत पोलीस ठाण्याचे अधिकारी काय म्हणाले?
विज्ञान नगर पोलीस स्टेशनचे अधिकारी दिवेश भारद्वाज यांनी सांगितले की, “मनजोत छाबरा असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे वय 18 वर्षे आहे. NEET च्या तयारीसाठी तो कोटाला आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि खोलीची झडती घेतली असता एक सुसाईड नोट सापडली. पालकांना कळविण्यात आले आहे. ते आल्यानंतरच पुढील कारवाई करू.”
ADVERTISEMENT
मुंबई Tak चावडी: मुंबई Tak चावडी: मुंडेंना राष्ट्रवादीत घेण्यास पवारांचा विरोध होता,पण… जिंतेंद्र आव्हाडांनी सांगितली Inside Story – Mumbai Tak
मुलांसोबत मैत्री करण्याची गरज
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मुलांना त्यांच्या प्रियजनांच्या सहवासाची गरज असते. नापास झाल्यावर टोमणे मारून नव्हे तर मित्र बनून मुलांना समजावण्याची गरज आहे. प्रियजनांच्या गैरवर्तनामुळे मुलांच्या मनाला खूप त्रास होतो. युवावस्थेत मुलांमध्ये अनेक मानसिक आणि शारीरिक बदल होतात. नवीन हार्मोन्स तयार होतात. अशा वयात बोलणीही मुलांच्या मनावर खोलवर परिणाम करून जाते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT