Sudhir More : ठाकरे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाचे झाले अनेक तुकडे

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

Shiv sena leader sudhir more dead body found near railway track in ghatkopar railway area of mumbai
Shiv sena leader sudhir more dead body found near railway track in ghatkopar railway area of mumbai
social share
google news

-लतिफ शेख, मुंबई

ADVERTISEMENT

Sudhir More death news : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते सुधीर मोरे यांचा संशयास्पद मृत्यू झाा आहे. या घटनेची माहिती समोर येताच खळबळ उडाली. सुधीर मोरे यांचा मृतदेह घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे रुळावर सापडला. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आलीये, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Shiv Sena UBT Leader sudhir more found dead in Ghatkopar, mumbai)

ठाकरेंच्या शिवसेनेचे कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. सुधीर मोरे हे ठाकरे गटाच्या शिवसेनेचे रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्कप्रमुखही होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुधीर मोरे यांचा मृतदेह गुरुवारी (31 ऑगस्ट) मध्यरात्री घाटकोपर स्टेशन परिसरातील रेल्वे रुळावर सापडला. त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

खासगी बैठकीला गेले… नंतर मृतदेहच सापडला

मिळालेल्या माहितीनुसार सुधीर मोरे गुरूवारी (31 ऑगस्ट) रात्री घराबाहेर पडले होते. आपण खासगी बैठकीला जात आहे, असे त्यांनी त्यांच्या खासगी सुरक्षारक्षकाला सांगितले होते. दरम्यान, त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास घाटकोपर रेल्वे स्थानकातील फास्ट ट्रॅकवर त्यांचा मृतदेह आढळून आला.

हेही वाचा >> Lepto-hepatitis : काळजी घ्या! मुंबईत 14 वर्षाच्या मुलाचा हिपॅटायटीस-लेप्टोने मृत्यू

याची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि त्यांच्या समर्थकांनी रेल्वे स्थानकात धाव घेतली. मोरे यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. त्यामुळे मोरे यांनी आत्महत्या केली की, त्यांच्यासोबत घातपात झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Mumbai Crime: संशयाचं भूत डोक्यात घुसलं अन् बायकोच्या मानलेल्या भावाचे केले पाच तुकडे

कोण होते सुधीर मोरे?

शिवसेनेते फूट पडल्यानंतर सुधीर मोरेंनी ठाकरेंच्या गटात राहण्याचा निर्णय घेतला होता. सुधीर मोरे यांच्या राजकीय प्रवासाची सुरूवात विक्रोळी पार्कसाईट भागातून झाली होती. त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. त्यांनी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केले. मोरे यांच्यावर पक्षाने रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सोपलेली होती. ते विभागप्रमुखही होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT