Crime : मुलींसारखा नटून थटून रिल्स बनवायचा, तरूणाने का संपवलं आयुष्य?
दहावीच्या एका विद्यार्थ्याला नटून थटून सोशल मीडियावर रिल्स बनवत होता. त्याचे तो व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन व्हायरलही करत होता. त्यामुळे त्याचे हजारो फॉलोअर्सही होते मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याला ट्रोल करण्यात आले होते. त्यामुळे त्याने काही त्याचा धसका घेतला होता का असा सवाल आता पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT
MP Suicide: मध्य प्रदेशातील उज्जैनमधील नागझरी पोलीस स्टेशन परिसरात दोन दिवसांपूर्वी दहावीच्या विद्यार्थ्याने (Student) घरी कोणीच नसताना गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. युवकाची आई घरी आली तेव्हा आपला मुलगा लटकलेल्या अवस्थेत दिसताच त्यांना मानसिक धक्का बसला आहे. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला खाली उतरवण्यात आले व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर झाला होता ट्रोल
या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ज्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तो मुलगा मुलींच्या स्टाईलमध्ये इन्स्टाग्रामवर रिल्स बनवत होता, व त्याचे तो व्हिडीओ व्हायरल करत होता. तो जेव्हापासून मुलींसारखे व्हिडीओ बनवत होता, त्यावेळे पासून सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात येत होते. त्याला वैयक्तिक मेसेज करुन लोकं त्याला त्रास देत होते. त्यामुळेच त्याने आत्महत्या केली असावी अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यानुसार आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
हे ही वाचा >> धावत्या बसमध्ये कंडक्टरचा चिरळा गळा, तरुणाच्या कृत्याने प्रवासी हादरले
घरात कोणीच नसताना घडली घटना
पोलिसांनी सांगितले की, प्रियांशू राजेंद्र यादव (वय 16, रा. डिव्हाईन सिटी, देवास रोड) याने बुधवारी सायंकाळी गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. त्याने ज्यावेळी गळफास घेतली होती, त्यावेळी घरात कोणीही नव्हते. त्यामुळे त्याच्या आत्महत्ये मागे नेमकं कारण काय हे समजणे अजून कठीण झाले आहे.
हे वाचलं का?
व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल
प्रियांशूने आत्महत्या केल्याचे उघड होताच पोलिसांनी त्या प्रकरणाची चौकशी केली असता अनेक गोष्टी आता पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. प्रियांशू हा इन्स्टाग्रामवर रिल्स बनवत होता. त्यामुळे त्याचे हजारो फॉलोअर्सही होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याला ट्रोल केले जात होते. कारण होते मुलगा असला तरी तो मुलीसारखं वेशभूषा करुन रिल्स आणि फोटो पोस्ट करत होता. तो नेहमी मेक-अप, नेलपॉलिश, दागिने आणि मुलींसारखेच कपडे घालून मुलींसारखे वेगवेगळ्या कपड्यांमधील अनेक फोटो व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता त्याच्या सोशल मीडियाचे अकाऊंट तपासत या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हे ही वाचा >> Crime: दोरीने गळा घोटळा, अल्पवयीन मुलाने भावालाच का संपवलं?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT