शेजाऱ्यासोबत अनैतिक संबंधाचा संशय, नवऱ्याने रागाच्या भरात पत्नीची…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Illegal Relationship with Neighbor
Illegal Relationship with Neighbor
social share
google news

Illegal Relationship with Neighbor :देशात अनैंतिक संबंधाच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे गुन्ह्याच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. अशीच एक अनैंतिक संबंधांची (Extra Marital Affair) धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत अनैंतिक संबंधांच्या संशयावरून नवऱ्याने बायकोला संपवल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेने संपूर्ण गाव हादरलंय. नेमकी ही संपूर्ण घटना काय आहे? हे जाणून घेऊयात. (suspicion of illegal ralationship with neighbor husband killed wife in lakhumpuri kheri uttar pradesh)

ADVERTISEMENT

घटनाक्रम काय?

लखीमपुर खीरीच्या (Lakhimpur kheri) घडलेल्या या घटनेत नवऱ्याला बायकोवर (wife) संशय होता. बायकोच शेजारीच राहणाऱ्या पुरुषासोबत लफडं होत, असा संशय नवऱ्याला (Husband) होता. हा संशय अनेकदा त्याने बायकोसमोर बोलून देखील दाखवला होता. त्यामुळे याच संशयामुळे पती-पत्नीमध्ये नेहमी घरात वाद व्हायचे. या वादामुळे दोघांमधील नात तुटण्याच्या परिस्थितीपर्यंत पोहोचलं होते.

हे ही वाचा >> अभिनेता व्हायचं होतं, मुंबईला येणार होता पण…; प्रकरण कळल्यावर पोलीस हादरले

जुम्मन पुरवा गावात राहणाऱ्या रामकुमारला त्याच्या बायकोवर (wife) संशय होता. बायकोचे शेजारी राहणाऱ्या तरूणासोबत अनैतिक संबंध होते,असे रामकुमारला वाटायचे. याच संशयावरून रामकुमारचे पत्नीसोबत नेहमी खटके उडायचे.त्यामुळे पत्नीसोबत असलेले सततचे वाद आणि संशयावरून नवऱ्याने तिच्या हत्येचा कट रचला होता.

दरदिवशी प्रमाणे 18 एप्रिल 2023 ला सुद्धा अशाचप्रकारे रामकुमारचे बायकोसोबत वाद झाला होता.याच वादातून रामकुमारने पत्नीची हत्या केली होती. या हत्येनंतर रामकुमार (Husband) फरार झाला होता. सकाळी घटना उघडकीस येताच संपूर्ण गावाला मोठा धक्का बसला होता. यावेळी स्थानिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता.

हे ही वाचा >> 6 नायजेरियन तरूणांनी 700 भारतीय महिलांना नादी लावलं, अन्…

पोलिसांनी या घटनेप्रकरणी तत्काळ तीन टीम बनवून आरोपीचा शोध सुरू केला. या तपासात त्यांनी आरोपी पतीला अदलाबाद गावा जवळून अटक केली. अटकेत असलेल्या रामकुमारची पोलिसांनी चौकशी (Police Inquiry) केली असता,त्याने गुन्ह्याची कबूली दिली. पत्नीचे शेजाऱ्यासोबत अनैतिक संबंध होते, अशी माहिती रामकुमारने पोलीस चौकशीत दिली होती.

ADVERTISEMENT

जु्म्मन पुरवा गावात रामकलीची हत्या तिचा नवरा रामकुमारने केली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात (Police) तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपी नवरा रामकुमारला आदिलाबाद गावाच्या जवळून अटक केली होती. यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने पत्नीचे शेजारी राहणाऱ्या तरूणासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती दिली होती. तसेच आरोपीने ज्या हत्याराने तिची हत्या केली होती, ते हत्यार देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सीओ राजेश कुमार यांनी सांगितले. ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडलीय.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> ‘मी कट्टर हिंदूवादी आणि परशुरामाचा वंशज’, चौकशीत आरोपी लवलेशचा खुलासा

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT