लिव्ह इन रिलेशन, मृतदेहाचे तुकडे तुकडे अन् फ्रिज…श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती!
Anuradha Reddy Murder Case : गेल्या वर्षी 16 मे 2022 रोजी श्रद्धा वालकर हत्याकांड घडलं होतं. या हत्याकांडानंतर संपूर्ण देश हादरला होता. अशाच हत्याकांडाची आता हैद्राबादमध्ये पुनरावृ्त्ती झाली आहे. श्रद्धा वालकर प्रमाणेच ही संपूर्ण घटना आहे.
ADVERTISEMENT
Anuradha Reddy Murder Case : गेल्या वर्षी 16 मे 2022 रोजी श्रद्धा वालकर हत्याकांड घडलं होतं. या हत्याकांडानंतर संपूर्ण देश हादरला होता. अशाच हत्याकांडाची आता हैद्राबादमध्ये पुनरावृ्त्ती झाली आहे. श्रद्धा वालकर प्रमाणेच ही संपूर्ण घटना आहे. पिडितेच्या हत्येपासून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापर्यंत एकूण एक घटना सारखी आहे. या घटनेत फक्त वर्ष बदलंलय महिनाही तोच तारीख एक दिवस मागे आहे. त्यामुळे आता श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या पुनरावृत्तीने हैद्राबाद हादरला आहे. दरम्यान नेमके हे संपूर्ण प्रकरण काय आहे? जे जाणून घेऊयात.(telengana hyderabad anuradha reddy murder case body parts fridge trunk recovery shraddha walker murder case repeated)
ADVERTISEMENT
घटनाक्रम काय?
तेलंगणाची राजधानी हैद्राबादमध्ये 17 मे 2023 रोजी कचराकुंडीत एका महिलेचं डोकं सापडलं होतं. तिगालापूर रोडवर काही सफाई कर्मचारी साफसफाई करत असताना त्यांना एका प्लास्टीकच्या थैलीत महिलेचे डोकं सापडलं होतं. या घटनेची माहिती मलकापेट ठाण्याच्या पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत महिलेचं डोकं ताब्यात घेऊन फॉरेन्सिसाठी पाठवले होते. या महिलेची ओळख पटावी यासाठी 735 पोलिस ठाण्य़ात शोध मोहिम, 450 सीसीटीव्ही फुटेज आणि 250 बेपत्ता महिलांची चौकशी करण्यात आली.पण पोलिसांच्या हातीच काहीच लागले नाही.
हे ही वाचा : CCTV: शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाला जागीच केलं ठार, उल्हासनगर हादरलं!
आरोपीसोबत लिव्ह इनमध्ये राहायची…
हत्येच्या पाच दिवसानंतर महिलेची ओळख पटली होती. या महिलेचे नाव यारम अनुराधा (55) होते आणि ती दिलसुख नगरमध्ये राहायची. अनुराधाचे लग्न झाले होते,मात्र काही वर्षापुर्वीच तिच्या पतीचे निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर अनुराधा 15 वर्ष एकटीच राहली. या दरम्यान तिची ओळख चंद्र मोहन नावाच्या व्यक्तीशी झाली होती. चंद्र मोहन हा अनुराधापेक्षा 7 वर्षाने लहान होता. पतीच्या निधनानंतर अनुराधा चंद्र मोहन सोबत दिलसुख नगरमध्ये राहायला लागली. नातेवाईकांव्यतिरीक्त इतर कोणाशीही तिची जास्त बातचीत व्हायची, अशा प्रकारे ती तिच्या घरातून रहस्यमयरित्या गायब झाली होती. 12 मे 2023 रोजी तिला शेवटचं पाहण्यात आले होते.
हे वाचलं का?
ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमुळे आरोपी फसला
पोलीस या घटनेचा तपास करताना अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासत होते. या तपासात त्यांना एका रिक्षावाल्यावर संशय आला होता. या रिक्षावाल्याने त्याचा चेहरा एका कपड्याने झाकला होता. त्यामुळे त्याला ओळखण अवघड जातं होते. मात्र आरोपीने महिलेचे शीर फेकताना एका हॉटेलमधून पाण्याची बॉटल खरेदी केली होती. ही बॉटल खरेदी करताना त्याने ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केले होते. या ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमुळे आरोपीची ओळख पटली आणि चंद्रमोहनला दिलसुख नगरमधून ताब्यात घेतलं.
ADVERTISEMENT
फ्रिजमध्ये ठेवले मृतदेहाचे तुकडे
सुरुवातीला चंद्रमोहन आरोपापासून टाळाटाळ करत होता, मात्र ज्यावेळेस पोलीसांनी चंद्रमोहनच्या घरी तपास केला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण चंद्रमोहनच्या फ्रिजमध्ये हाता-पायाचे तुकडे सापडले. तसेच अनुराधाचे धड एका लोखंडी पेटीत ठेवले होते. आरोपीच्या घरातून इतक्या सर्व गोष्टी मिळाल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Crime: पोलीस महिलेसोबत लव्ह, सेक्स, अन्.. इंस्टाग्राममुळे घडली आयुष्यभराची अद्दल
आरोपी काय म्हणाला?
2018 साली आरोपी चंद्रमोहनने अनुराधाकडून 7 लाख रुपये उधार घेतले होते. हे पैसे त्याला परत करता आले नव्हते. त्यामुळे या पैशावरून दोघांमध्ये नेहमी खटके उडायचे. त्या रात्री देखील तिने याच पैशांची मागणी केली होती. त्यामुळे सततची भांडणे आणि पैशाचा तगादा यापासून सुटका करून घेण्यासाठी त्याने अनुराधाच्या हत्येचा कट रचला. अनुराधावर चाकूने वार करून तिची हत्या केली. या हत्येनंतर त्याने अनुराधाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी श्रद्धा वालकर हत्याकांडांची संपूर्ण कॉपी केली.
स्टोन मशीन खरेदी…
चंद्रमोहनसाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण आव्हानात्मक होते. त्यामुळे त्याने मृतदेहाचे तुकडे तुकडे करून विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला, यासाठी त्याने बाजारातून स्टोन मशीन खरेदी केली. या मशीद्वारे त्याने मृतदेहाचे तूकडे तूकडे केले. चंद्रमोहन शीर कापूर धडावेगळे केले तर हाता-पायांचे तुकडे तुकडे केले आणि उरलेले शरीर तसेच पेटीत ठेवलं. घरात आणि घराबाहेर मृतदेहाचा वास येऊ नये यासाठी फिनाईल, डेटॉल, परफ्युम, अगरबत्ती आणि कपूर साऱख्या गोष्टींचा वापर केला.
चंद्रमोहनने नंतर एक एक करून मृतदेहाची विल्हेवाट लावायला सुरूवात केली.सुरूवातीला त्याने शीर एका नदीत फेकले. त्यानंतर अनुराधाच्या मृतदेहाचे इतर पार्ट फ्रिजमध्ये ठेवले. या इतर पार्टची विल्हेवाट करण्याआधीच पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला अटक केली. विशेष म्हणजे श्रद्धा वालकर हत्याकांडाप्रमाणेच चंद्रमोहन अनुराधाचा फोन वापरत होता. तिच्या नातेवाईकांशी बोलायचा.त्यामुळे कोणालाच संशय झाला नाही.
हे ही वाचा : 50 हजाराची सुपारी अन् भाड्याचे गुंड, बायकोने फुलप्रुफ प्लान करून पतीचा काढला काटा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT