Crime: तब्बल 8 महिने सुरू होती महिलेच्या अंर्तवस्त्राची चोरी, चोर निघाला….

मुंबई तक

ADVERTISEMENT

undergarments thief cought by womam in ahemadabad gujrat clash over women innerwear
undergarments thief cought by womam in ahemadabad gujrat clash over women innerwear
social share
google news

अहमदाबादमधून चोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे. साधारणपणे एक चोर पैसै, दागिने, तिजोरी साऱख्या वस्तु चोरी करते. मात्र या घटनेत अंर्तवस्त्र चोरीला गेल्याची घटना घडली आहे. तब्बल 8 महिने हा संपूर्ण प्रकार सुरू होता. या घटनेतील चोर शोधण्यासाठी महिलेने स्वत:नेच तपास सुरू करत घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज लावला होता. यावेळी महिलेला ज्यावेळेस चोर कोण आहे? याची माहिती मिळाली. त्यावेळेस तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. दरम्यान हा आरोपी कोण होता? आणि महिलेने त्याला कसे ताब्यात घेतले हे जाणून घेऊयात. (undergarments thief cought by womam in ahemadabad gujrat clash over women innerwear)

ADVERTISEMENT

अहमदाबादच्या धंधुका तहसीलच्या पछाम गावात राहणाऱ्या एका 30 वर्षीय महिलेसोबत अर्तवस्त्र चोरीला जात असल्याची विचित्र घटना घडली होती. एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल 8 वर्ष महिलेसोबत हा प्रकार सुरु होता. या घटनेने महिलेला गोत्यात सापडली होती. तिला कळेनाच नेमके कोण तिची अंर्तवस्त्र चोरत होते.अखेर या घटनेला कंटाळून महिलेने स्वत:च या चोरीवर लक्ष ठेवायला सुरूवात केली. यामध्ये महिलेचा संशय शेजाऱ्यावर बळावला होता.

हे ही वाचा : धक्कादायक! नर्सशी संबंध ठेवताना रूग्णाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

दरम्यान आरोपीला पकडायचे कसे असा प्रश्न तिच्यासमोर होता. यावर तिने आरोपीला रंगेहाथ पकडण्याचा निर्णय घेतला होता.यासाठी महिलेने घटनास्थळावर सीसीटीव्ही फुटेज लावले होते.या माध्यमातून महिलेने चोरावर नजर ठेवायला सुरू केली. यावेळी सीसीटीव्ही कॅमेरात तिचाच शेजारी अंर्तवस्त्र चोरी करताना आढळला होता.चोर कळाल्यानंतर महिलेने सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडण्याची तयारी केली.

हे वाचलं का?

दुसऱ्या दिवशी महिलेने कपडे सुखत घातले आणि नंतर घरात जाऊन नजर ठेवली. यावेळी शेजारी अर्तवस्त्र चोरायला येताच महिलेने चोराच्या दिशेने धाव घेतली आणि रंगेहाथ पकड़ले. मात्र चोराने थेट महिलेली छेड काढत मारहाण करायला सुरुवात केली. आरोपीच्या या कृत्यानंतर महिलेने आरडाओरड सूरू केली. महिलेची ही ओरड एकूण कुटूंबातील पूरूष मंडळी लाठ्या आणि पाईप घेऊन मारायला आली. या दरम्यान महिलेचे कुटुंब आणि आरोपीच्या कुटुंबात जोरदार राडा झाला. यानंतर पोलिस ठाण्यात हे प्रकरण पोहोचले होते.

या प्रकरणाचा तपास करणारे इंस्पेक्टर पीएन जिंजाडिया यांनी सांगितले की, या भांडणामध्ये 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर दोन्ही गटातील 20 लोकांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी महिलेच्या नातेवाईकांविरोधात हाणामारी करून नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीविरोधात विनयभंग, भांडणे आणि चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : धक्कायदायक घटना! धावत्या बसमध्ये तरूणीसोबत शरीरसंबंध ठेवले नंतर…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT