Rape Case : नात्याला काळीमा! सावत्र बापाचा मुलीवर बलात्कार,अश्लील व्हिडिओ बनवून…
उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेत सावत्र बापानेच मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे आरोपी बाप बलात्कार करून थांबला नाही तर त्याने तिचे अश्लील व्हिडिओ बनवले.
ADVERTISEMENT
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) फिरोजाबादमधून (Firozabad) नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेत सावत्र बापानेच मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे आरोपी बाप बलात्कार करून थांबला नाही तर त्याने तिचे अश्लील व्हिडिओ बनवले. या अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून सावत्र बाप तिच्यावर वारंवार बलात्कार करत राहिला. या प्रकरणी आता मुलीने तिच्या आईसह पोलीस स्टेशन गाठत सावत्र बापाविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सूरू केला आहे. (uttar pradesh firozabad crime story step father raped daughter made video for viral)
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिरोजाबादमधील दक्षिण इलाका पोलीस ठाणे हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील पीडित तरूणीच्या आईचे चार वर्षापूर्वीच पतीसोबत घटस्फोट झाला होता. या घटस्फोटानंतर तीन वर्षापुर्वीच महिलेने एका व्यक्तीसोबत लग्न केले. यामध्ये महिलेला पहिल्या पतीपासून एक मुलगी होती.या मुलीसह महिला आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत राहत होती.
हे ही वाचा : ‘…अन् PM मोदी RBI गव्हर्नरला म्हणाले, ‘नोटांच्या ढिगाऱ्यावर बसलेला साप’
या दरम्यान महिलेच्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने सावत्र बापाविरोधात बलात्काराचा आरोप केला होता. सावत्र बापाने माझ्यावर बलात्कार करून अश्लील व्हिडिओ बनवले आणि ब्लॅकमेल करायला सुरूवात केली होती, असा आरोप अल्पवयीन मुलीने केला होता. ही संपूर्ण घटना मुलीने आपल्या आईला सांगितली. या सर्व प्रकारानंतर पीडितेच्या आईचं तिचा दुसरा पती राजू सोबत वाद झाला होता. या वादानंतर महिलेने आपल्या मुलीसह पोलीस ठाणे गाठत संपूर्ण घटनेची माहिती दिली.
हे वाचलं का?
पोलिसांनी महिला आणि अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.तसेच पोलीसांनी आरोपी राजूला अटक करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पळ काढताना राजूची खांब्याला धडक बसली. या धडकेत त्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन जिल्हा रूग्णालयातील ट्रामा सेंटरमध्ये भरती केले. डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे.
महिलेने अल्पवयीन मुलीसोबत तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सावत्र बापाने मुलीवर बलात्कार झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तसेच आरोपीला अटक करताना पळून जाण्याच्या प्रयत्नात चो जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती फिरोजाबाद सिटी सीओ कमलेश कुमार यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : ‘नव्या संसदेतील ‘ते’ विधेयक फक्त जुमलाच’, सुप्रिया सुळेंनी सरकारला फटकारले
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT