लष्कारातून निवृत्त झालेल्या सासऱ्याने सुनेचा गळा चिरला, कारण ऐकून बसेल धक्का
लष्कारातून निवृत्त झालेल्या सासऱ्याने पकोडे खाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर काही वेळात त्याला पकोडे खाण्यासही मिळाले मात्र ज्या सुनेने पकोडे करुन दिले होते, त्याच सुनेची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केली आहे.
ADVERTISEMENT
Murder Case: पश्चिम बंगालमधील हावडामध्ये (Howrah in West Bengal) एक धक्कादायक घटना घडली आहे. हावडामध्ये राहणारे 75 वर्षाचे गोपाल विश्वास यांना पकोडे खाण्याची इच्छा झाली होती. म्हणून त्यांनी आपल्या सुनेलाही पकोडे तयार करण्यास सांगितले. त्यानंतर पकोडे तयार करुन दिल्यानंतर, त्यांची सून मुक्ती विश्वास यांनी त्यांना कोल्ड्रिंक्सही पेण्यासाठी दिले होते. मात्र तरीही त्यांचा मुलगा घरात नसताना सासऱ्याने आपल्या सुनेची हत्या (Murder) केली आहे. ज्या गोपाल विश्वासने हत्या केली आहे, तो आरोपी लष्करातून निवृत्त झाला असून पोलिसांनी त्यांच्या गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
ADVERTISEMENT
पकोडे खाण्याचा धरला हट्ट
गोपाळ विश्वासने आपल्या पकोडे खायचे असल्याचे सांगत सुनेला ते तयार करण्यासही सांगितले. त्यानंतर तिने ते तयारही करुन दिले. त्यानंतर घरातील सर्वांनी एकत्र जेवण केले आणि ते सगळे आपापल्या खोलीत निघून गेले. मुक्तीही आपल्या खोलीत मोबाईल बघत बसली होती, तर तिचा लहान मुलगा संगणकावर काही तरी करत बसला होता. त्याच वेळी मुक्तीच्या धाकट्या मुलाने दिवाळीसाठी मेणबत्त्या आणण्याचा हट्ट केला. त्याला मेणबत्त्या आणण्यासाठी त्याचे वडील बाजारात गेले. मात्र मुक्तीचा नवरा घरी परतला तेव्हा मात्र त्याला एक मोठा धक्का बसला. कारण ते जेव्हा घरी परतले होते, तेव्हा पत्नी मुक्ती त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिची ती अवस्था पाहून मुक्तीचा पती देबू विश्वासने आरडाओरड करुन मदत मागितली. त्यावेळी शेजारीपाजारी असलेले लोक त्यानंतर जमा झाले.
हे ही वाचा >> “चार हात असलेली लक्ष्मी कशी जन्म घेऊ शकते”, SP नेत्याच्या ट्विटने भडकला नवा वाद
मुक्ती रक्ताच्या थारोळ्यात
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुक्तीला त्यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर या घटनेची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी सासऱ्याला ताब्यात घेतले.याबाबत स्थानिकांनी सांगितले की, कुटुंबामध्ये कोणताही कौटुंबिक वाद किंवा मालमत्तेवरुनही वाद नव्हता. मात्र गोपाल विश्वास यांना त्यांचा मुलगा डेबू याने वडिलांना फाशीची देण्याची मागणी केली आहे. कारण त्यांच्यामुळेच त्यांच्या निष्पाप पत्नीला आपला जीव गमवावा लागला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डेबू यांच्या म्हणण्यानुसार, त्याचे वडील खूप हट्टी होते, ते जे बोलतील ते करावेच लागायचे. त्यामुळे समोरचा चुकीचा आहे की बरोबर ते मात्र ते पाहत नव्हते.
हे वाचलं का?
नवऱ्याला बसला धक्का
या घटनेची माहिती सांगताना डेबू म्हणाला की, ‘माझ्या पत्नीने घरी मासे आणि इतर पदार्थ केले होते. मात्र वडिलांना पकोडे खायचे होते, त्यामुळे त्यांनी माझ्या पत्नीला तसं सांगितलंही. तिनेही पकोडे करुन दिले मात्र ज्यावेळी मी बाजारातून घरी आलो तेव्हा पत्नी मुक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. ते पाहून आम्हाला धक्काच बसला.
घरात होती धारदार शस्त्र
मुक्तीच्या नवऱ्याने सांगितले की,काही वर्षांपूर्वी माझे वडील घर सोडून कुठेतरी गेले होते, काही महिन्यांनी ते घरी परतले त्यानंतर त्यांनी घरात धारदार शस्त्र आणून ठेवली होती. त्याच शस्त्राने माझ्या पत्नीची त्यांनी हत्या केल्याचेही मुक्तीच्या पतीने सांगितले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> मौलाना रहीमुल्ला तारिकची पाकिस्तानात हत्या, ‘जैश’च्या दहशतवाद्याबरोबर होते जवळचे संबंध
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT