अतिक आणि अशरफवर गोळ्या झाडणारा शुटर अरुण उर्फ कालिया कोण आहे?
Atik ahmad Killer : माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद दोघांची शनिवारी रात्री तीन शूटर्सनी हत्या केली. हत्येनंतर तिन्ही हल्लेखोर हात वर करून पोलिसांना शरण आले. या हत्याकांडात सहभागी असलेल्या शूटर्सपैकी एक यूपीच्या कासगंज जिल्ह्यातील रहिवासी आहे. जीआरपी पोलिसांच्या हत्येप्रकरणी तो यापूर्वीच तुरुंगात गेला होता. तुरुंगातून सुटल्यानंतर तो कासगंजच्या बाहेर गेला होता. (Who […]
ADVERTISEMENT
Atik ahmad Killer : माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद दोघांची शनिवारी रात्री तीन शूटर्सनी हत्या केली. हत्येनंतर तिन्ही हल्लेखोर हात वर करून पोलिसांना शरण आले. या हत्याकांडात सहभागी असलेल्या शूटर्सपैकी एक यूपीच्या कासगंज जिल्ह्यातील रहिवासी आहे. जीआरपी पोलिसांच्या हत्येप्रकरणी तो यापूर्वीच तुरुंगात गेला होता. तुरुंगातून सुटल्यानंतर तो कासगंजच्या बाहेर गेला होता. (Who is Arun aka Kalia, the shooter who shot Atiq and Ashraf?)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराजच्या धुमनगंज मेडिकल कॉलेजमध्ये अतिक अहमद आणि अशरफ यांच्यावर गोळीबार करणारा शूटर अरुण मौर्य हा कासगंजमधील बघेला पुख्ता गावचा रहिवासी आहे. गावात तो अरुण मौर्य उर्फ कालिया या नावाने ओळखले जायचा. अरुण लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तो मोठा झाल्यावर सोरोन शहरात जाऊन राहू लागला.
2014-15 मध्ये, कासगंज बरेली-फर्रुखाबाद रेल्वे मार्गावर उजयनी आणि सोरोन दरम्यान चालत्या ट्रेनमध्ये दरोडा टाकल्यानंतर एका कॉन्स्टेबलची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अरुण तुरुंगात गेला. त्यानंतर त्याचे तार गुन्हेगारांशी जोडले गेले आणि तो गुन्हेगारीच्या जगात वावरत गेला. अरुणला दोन लहान भाऊ देखील आहेत, ते फरीदाबादमध्ये राहतात आणि रद्दीचे काम करतात.
अरुणची आई सविता आणि वडील हिरालाल दोघेही आता या जगात नाहीत. अरुण मौर्य यांची मावशी लक्ष्मी देवी आणि काका गावात राहतात. मावशी लक्ष्मीच्या म्हणण्यानुसार, तो आठ वर्षांपूर्वी सोरोनमध्ये राहण्यासाठी आला होता. त्यानंतर तो आजतागायत कासगंजला आला नाही. तो गावात यायचा, पण कोणाशी बोलत नसे. प्रयागराजमध्ये अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येची बातमी मिळताच गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शनिवारी दोघांची हत्या झाली होती
शनिवारी रात्री 10 वाजता पोलिसांचे पथक अतिक अहमद आणि अशरफ यांना वैद्यकीय तपासणीसाठी प्रयागराजमधील कोल्विन हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते. दरम्यान, पत्रकार म्हणून पोचलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात अतिक आणि अश्रफ या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींचा समावेश असून त्यापैकी लवलेश तिवारी हा बांदा येथील रहिवासी आहे. अरुण मौर्य हा कासगंजचा, तर तिसरा आरोपी सनी हा हमीरपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT