Crime : परफ्युम लावून घराबाहेर पडली, संतापलेल्या नवऱ्याचं भयंकर कृत्य

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

wife came out if house wearing perfume husband shot in chest crime story
wife came out if house wearing perfume husband shot in chest crime story
social share
google news

क्षुल्लक कारणावरून नवरा-बायकोमध्ये भांडणे नेहमी होतच असतात. मात्र काही भांडणाचा शेवट इतका धक्कादायक होतो की त्याची कल्पना देखील करता येणार नाही. अशीच एक घटना आता मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमधून समोर आली आहे. या घटनेत परफ्युम लावून कुठे चाललीस असे विचारताच नवरा बायकोमध्ये वाद झाला. या वादातून नवऱ्याने बायकोवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली.या घटनेत बायको गंभीर जखमी झाली असून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे. (wife came out if house wearing perfume husband shot in chest crime story)

ADVERTISEMENT

बिजौली पोलिस ठाणे हद्दीतील गणेशपूरा परिसरात ही घटना घडली आहे. नीलम जाटव नावाच्या महिलेचे 8 वर्षापूर्वीच बामोर जनकपूर परिसरात राहणाऱ्या महेंद्र जाटवशी लग्न झाले होते. या लग्नानंतर महेंद्र जाटवला चोरीच्या आरोपाखाली तब्बल 4 वर्ष तुरूंगवास भोगावा लागला होता. हा तुरूंगवास भोगून आल्यानंतर नवरा बायकोच्या माहेरी राहत होता. साधारण वर्षभरापासून ते एकत्र माहेरी राहत होते.

हे ही वाचा : Love मॅरेजनंतरही बायको फिरत होती दुसऱ्यासोबत, नवऱ्याने मागून जाऊन..

छातीत झाडली गोळी

दरम्यान रविवारी नीलम परफ्युम लावून बाहेर जाण्याची तयारी करत होती. यावर पती महेंद्रने तिला टोकत विचारले,’इतकी तयार होऊन कुठे चालली आहेस?’, याच गोष्टीवरून दोघा पती-पत्नीमध्ये वाद झाला. याच वादातून महेंद्रने संतापून बाजूलाच ठेवलेल्या बंदुकीने बायकोवर गोळी झाडली. या हल्ल्यात बायको गंभीर जखमी होऊन खाली कोसळली आणि पती महेंद्रने घटना स्थळावरून पळ काढला होता. या घटनेची माहिती मिळताच जखमी नीलमचा भाऊ दिनेश जाटवने तत्काळ तिला रूग्णालयात दाखल केले होते.

हे वाचलं का?

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस रूग्णालयात दाखल झाली होती. यावेळी जखमी नीलमने पोलिसांना सांगितले की, आमच्यामध्ये थोडं भांडण सुरु होती. पण मला काय माहिती त्यांनी कंबरेत बंदुक ठेवली आहे. त्यांनी विचारले की,”तु सेंट लावला आहेस”, ”सेंट लावून कुठे चालली आहेस?” ,यावरून आमच्यात छोटसे भांडण झाले आणि त्यांनी गोळीच झाडली, असे नीलमने पोलीस जबाबात सांगितले आहे.

पोलिसांनी कुटुंबियांच्या तक्रारीनंतर आरोपी पतीवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरु केला आहे. पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. याच वादातून आरोपीने गोळी मारून हत्येचा प्रयत्न केला होता, असे ग्वाल्हेरच्या उपविभागीय अधिकारी हिना खान म्हणाल्या आहेत. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Crime : बाथरूममध्ये गेला अन् स्कूल ड्रेसच्या टायने…कुटुंब हादरलं!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT