बायकोची हत्या, मेहुणीसोबत गाठला क्रूरतेचा कळस! सायको किलरने पोलिसांनाही फोडला घाम

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

wife murder rape of sister in law and childer psycho killer uttar pradesh crime story
wife murder rape of sister in law and childer psycho killer uttar pradesh crime story
social share
google news

उत्तर प्रदेशच्या उधम सिंह नगरमधून एका धक्कादायक हत्याकांडाचा खुलासा झाला आहे. या हत्याकांडातील आरोपी सायको किलरने कुटुंबियासोबत जे कृत्य केले आहे, ते वाचून तुमच्या अंगावर काटा येणार आहे. कारण या घटनेत सायको किलरने आधी बायकोची हत्या केली, नंतर तिचा मृतदेह पूरला. सालीवर बलात्कार करून तिच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला, इतकचं नाही तर आपल्या पोटच्या पोरांना देखील छळ मांडला. हा संपूर्ण घटनाक्रम ऐकूण पोलिसांना देखील हादरा बसला आहे. (wife murder rape of sister in law and children psycho killer uttar pradesh crime story)

ADVERTISEMENT

वरिष्ठ पोलिस अधीक्षक मंजूनाथ टीसी यांनी दिलेल्या माहितीनूसार, प्रतापूरच्या गावचा रहिवासी असलेल्या संतोष कुमारने त्याच्या बायकोची हत्या करून मृतदेह पूरल्याची माहिती 27 जुलैला मिळाली होती. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करून आम्ही तपास सुरू केला. या तपासात आम्ही आनंदपूरमधून आरोपी संतोषला ताब्यात घेतले. यावेळी संतोषची चौकशी केली असता त्याने धक्कादायक खुलासे केले.

हे ही वाचा : तीन दिवसापूर्वीच साजरा केला वाढदिवस,असं काय घडलं की आईने मुलाचा घोटला गळा

आरोपीने पोलिस चौकशीत सांगितले की, 2019 साली बायकोने माझ्यावर मारहाण आणि अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला होता.यानंतर मला तीन महिने तुरूंगवास भोगावा लागला होता. याचाच राग संतोषच्या मनात होता. दरम्यान संतोष जेलमधून बाहेर आल्याच्या दोनच महिन्यानंतर याच कारणावरून बायकोशी भांडण झाले. तसेच त्याला बायकोचे भावासोबत अनैतिक संबंध असल्याचाही संशय होता. याच संशयातून त्याने बाबूने बायकोवर वार करून तिची हत्या केली. या हत्येनंतर तिचा मृतदेह नाल्यात पूरला होता. पोलीस चौकशीत आरोपी संतोषने बायकोच्या हत्येची कबुली दिली होती.

हे वाचलं का?

पहिल्या बायकोचा संशयास्पद मृत्यू

दरम्यान या चौकशीत संतोषची पहिली बायको रंभाचाही 10 वर्षापूर्वी संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.आणि आता पोलीसांना त्याच्या पहिल्या बायकोचीही हत्या आरोपीनेच केल्याचा संशय आहे. तसचे पहिल्या बायकोच्या मृत्यूनंतर आरोपीने दुसरे लग्न केले. जिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या बायकोपासून त्याला तीन मुले होती.

वहिनीसोबत अनैतिक संबंध

सायको किलर संतोषने आपल्या मुलाना देखील सोडलं नाही. त्यांच्यासोबतही धक्कादायक कृत्य केले. संतोषने पहिल्या मुलाला विकून टाकलं आणि दुसऱ्या मुलाची निर्घृण हत्या केली होती. मात्र आरोपीने दुसर बाळ मृत जन्माला आल्याचे म्हटलं आहे. यानंतर जेव्हा तिसऱ्यांदा बायको गर्भवती होती, तेव्हा तिच्या देखभालीसाठी वहिनीला घरी आणले होते. मात्र यातही धक्कादायक खुलासा समोर आला. पोलिस चौकशीत आरोपीने वहिनीसोबत अनेकदा शारीरिक संबंधही ठेवले होते. कुटुबियांना या घटनेची माहिती मिळताच वहिनीला तिच्या घरी पुन्हा नेण्यात आले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : हॉटेलवर गेले, रोमान्स केला, छुप्या कॅमेऱ्यात…, कपलसोबत घडला भयंकर प्रकार

मेहुणीसोबत धक्कादायक कृत्य

बायकोची हत्या केल्यानंतर आरोपी त्याच्या सासरी गेला मेहुणीला घरी घेऊन आला. आणि मेहुणीसोबत त्याने कथितरीत्या लग्न केले. या लग्नानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. तिची नखे खेचून काढली, तिच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला.अशाप्रकारे त्याने मेहूणीची छळ केला आहे.पोलिसांना संशय आहे की आरोपीने दुसऱ्या बायकोची हत्या तर केलीच आहे तिच्या आधी त्याने पहिल्या बायकोचीही हत्या केली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT