Bajrang Sonawane: पंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या खासदाराच्या गाडीला अपघात! नेमकं घडलं काय?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Beed News : Bajrang Sonawane car Accident : लोकसभा निवडणूक 2024 (lok sabha election 2024) चा निकाल अखेर काल (4 जून) लागला. महाराष्ट्रात लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदारसंघाचा निकाल ऐतिहासिक ठरला. अगदी शेवटच्या फेरीपर्यंत निकालामध्ये ट्विस्ट दिसत होता. शेवटी या मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. तर, शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे विजयी झाले.

बजरंग सोनवणे यांनी तब्बल 7 हजार मतांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. ते यावेळी जायंट किलर ठरले. विजयानंतर जेव्हा ते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यांचा अपघात झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, गाडीतील कुणालाही गंभीर इजा झाली नसल्याची माहिती आहे. काहीजण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत अशी माहिती मिळाली आहे.

हेही वाचा : Beed Lok Sabha Elections Results 2024 : मुंडेंचा बालेकिल्ला ढासळला! पंकजां मुंडेंचा निकाल काय?

बजरंग सोनवणेंसोबत नेमकं काय घडलं?

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना पिछाडीवर टाकत बजरंग सोनवणेंनी विजय मिळवल्यानंतर रात्रीच ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला निघाले. या भेटीला जात असतानाच त्यांच्या ताफ्यातील गाडी धडकल्याने अपघात झाला. हा अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली होती परंतु सर्वजण सुखरुप असल्याची माहिती मिळाल्याने समर्थकांना दिलासा मिळालेला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : Uddhav Thackeray : ''इंडिया आघाडी सरकार स्थापन करणार''

मिळालेल्या माहितीनुसार, बजरंग सोनवणेंच्याच ताफ्यातील गाडी त्यांच्या गाडीला धडकल्याने हा अपघात झाला. यात काहीजण जखमी झाले. सध्या जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती समजली आहे. हा अपघात रात्री उशीरा जालना जिल्ह्यातील धुळे- सोलापूर महामार्गावर झाला आहे. 

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT