एग्जिट पोल

Maharashtra Lok Sabha 2024 : शिंदे 'ही' जागा जिंकणार; सट्टा बाजाराने ठाकरेंची वाढवली चिंता

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे.
नाशिक लोकसभा मतदारसंघाबद्दल सट्टा बाजाराने मांडलेल्या अंदाजाची चर्चा होत आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणूक २०२४ सट्टा बाजार अंदाज

point

नाशिक लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४

point

सट्टा बाजाराचा लोकसभा निवडणुकीबद्दल अंदाज काय?

Lok Sabha Election 2024 Shiv Sena : लोकसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतशी उमेदवार आणि राजकीय पक्षांची धडधड वाढू लागली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा असून, महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला  लागली आहे. महत्त्वाचं म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या महायुतीतील दोन पक्षांना किती जागा मिळणार, याची उत्सुकता असून, सट्टा बाजाराने नाशिकची जागा शिंदेंची शिवसेना जिंकेल, असा अंदाज मांडला आहे. (eknath Shinde's Shiv Sena will be win Nashik Lok Sabha seat, prediction of Betting market)

नाशिक लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना अशी थेट लढत आहे. या मतदारसंघातून छगन भुजबळांना उमेदवारी देण्याची सूचना भाजपने केली होती, पण शिंदेंनी ही जागा राखत पुन्हा एकदा हेमंत गोंडसेंना उमेदवारी दिली.

हेही वाचा >> BJP जिंकणार की नाही, सट्टा बाजाराने कोणाचं वाढवलं टेन्शन? 

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी राजाभाऊ वाझे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे-शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. गेल्या दोन वेळा शिवसेनेकडे राहिलेल्या या मतदारसंघात यावेळी कोणत्या शिवसेनेचा विजय होईल, यांची चर्चा असताना सट्टा बाजाराने शिंदेंच्या शिवसेनेच्या बाजूने अंदाज व्यक्त केला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील चुरशीच्या लढती, सट्टा बाजाराचा अंदाज काय?

1) नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नितीन गडकरी हे जिंकतील, असा सट्टा बाजाराचा अंदाज आहे. 

2) चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा विजय होईल, असे भाकित सट्टा बाजाराने केले आहे. येथून प्रतिभा धानोरकर या निवडणूक लढवत आहेत. 

ADVERTISEMENT

3) यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात उमेदवार बदलूनही शिंदेंना फटका बसणार, असा अंदाज सट्टा बाजाराने व्यक्त केला आहे. येथून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय देशमुख हे निवडणूक लढवत आहे. सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार ही जागा ठाकरेंची शिवसेना जिंकेल.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> "महायुतीला 20 जागांचा फटका, मविआला...", यादवांनी वाढवलं भाजपचं टेन्शन

4) गेल्यावेली अपक्ष खासदार झालेल्या नवनीत राणा यावेळी भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. पण, त्यांना यावेळी झटका बसेल, असा अंदाज आहे. अमरावतीची जागा काँग्रेस जिंकेल, असे सट्टा बाजाराचे भाकित आहे. येथून काँग्रेसचे बळवंत वानखेडे निवडणूक लढवत आहेत. 

5) महाराष्ट्रासह देशाचं लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून पुन्हा सुप्रिया सुळे विजयी होतील, असे सट्टा बाजाराचा अंदाज आहे.

हेही वाचा >> MVA महाराष्ट्रात 'या' जागा जिंकणार? सट्टा बाजाराचा मोठा अंदाज 

6) भाजपने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पियूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. ते विजयी होतील, असा अंदाज आहे. 

7) शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पराभव होईल. तर शाहू छत्रपती हे विजयी होतील, असा अंदाज सट्टा बाजाराने मांडला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT