Lok Sabha Opinion Poll: मविआसाठी धोक्याचा इशारा.. भाजप ठरणार बाहुबली! ठाकरे-पवारांना मिळणार 'एवढ्या' जागा

मुंबई तक

ADVERTISEMENT

भाजप ठरणार बाहुबली! ठाकरे-पवारांना मिळणार 'एवढ्या' जागा
भाजप ठरणार बाहुबली! ठाकरे-पवारांना मिळणार 'एवढ्या' जागा
social share
google news

Maharashtra Opinion Poll: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha 2024)  संदर्भात INDIA TV-CNX चा नवीन ओपिनियन पोल आता समोर आला आहे. महाराष्ट्रासंदर्भातील या सर्वेक्षणातील आकडेवारी ही अतिशय चक्रावून टाकणारी आहे. ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात NDA च्या विजयाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील 48 जागांवर पाच टप्प्यात मतदान होणार आहे. NDA आणि INDIA या दोन्ही आघाडीतील पक्ष आपापल्या उमेदवारांची घोषणा करत आहेत. इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या सर्वेक्षणानुसार 2024 च्या लोकसभा निवडणुकांबाबत महाराष्ट्रातील लोकांचा मूड काय आहे हेच आम्ही आपल्याला सांगणार आहोत. (lok sabha opinion poll will nda make a strong comeback in maharashtra see what the latest india tv cnx survey bjp won most seats )

ADVERTISEMENT

INDIA TV-CNX चा नेमका सर्व्हे काय?

INDIA TV-CNX च्या ओपिनियन पोलनुसार, आज निवडणुका झाल्या तर NDA महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 37 जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पक्षनिहाय जागांच्या बाबतीत बोलायचे झाले तर राज्यात 27 जागांसह भाजप आघाडीवर असेल असा इंडिया टिव्हीच्या ओपिनियन पोलचा अंदाज आहे. तर त्यांचा मित्रपक्ष शिवसेनेला (शिंदे गट) 8 आणि राष्ट्रवादीला (अजित पवार) 2 जागा मिळण्याची शक्यता आहे.

'इंडिया'आघाडीबाबत या सर्व्हेत असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, शिवसेना (UBT)7 जागा जिंकू शकते, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 2 जागा जिंकू शकते, तर काँग्रेस केवळ एकाच जागेवर जिंकू शकेल आणि इतर 1 जागांवर विजय मिळवेल असं सर्व्हेत म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> राज ठाकरेंना फडणवीसांची साद; म्हणाले, ''मोदींना पाठिंबा द्या''

म्हणजे या सर्व्हेनुसार, महायुती आघाडी राज्यात 37 जागा जिंकू शकतं. तर महाविकास आघाडीला केवळ 10 जागा आणि इतरांना केवळ 1 जागे मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून महाराष्ट्रातील पक्षांचे समीकरण पूर्णपणे बदललं

2019 च्या लोकसभा निवडणुका उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपने एकत्र लढवल्या होत्या. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे यूपीएचा भाग होते. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडली.

ADVERTISEMENT

आगामी निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन वेगवेगळे गट पडले आहेत. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे एनडीएचा भाग आहेत. तर शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे 'इंडिया' सोबत आहेत. म्हणजे दोन्ही पक्षांचा एक गट NDA सोबत आणि दुसरा गट 'INDIA' सोबत आहे.

ADVERTISEMENT

2019 लोकसभेत महाराष्ट्राचा असा होता निकाल..

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील निकालाचा विचार केला तर, भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या आणि शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या. तर त्यावेळी यूपीएमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार तर काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली होती. त्याचवेळी असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष MIM एका जागेवर विजय मिळवला होता. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता.

हे ही वाचा>> "शिंदेंवर खूप दबाव...", तिकीट कापल्यानंतर तुमानेंनी सोडलं मौन

असा होता India TV-CNX चा आधीचा ओपिनियन पोल

इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या शेवटच्या ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 35 जागांवर विजय मिळवेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, तर 'इंडिया' आघाडीला 13 जागा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, नुकत्याच करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार यामध्ये आणखी घट झाली असून आता सर्व्हेमध्ये इंडिया आघाडीला केवळ 10 जागा मिळतील असं दाखविण्यात आलं आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT