एग्जिट पोल

Lok Sabha 2024 : "भाजपला बहुमत मिळणे कठीण", राजकीय विश्लेषकाने सांगितले कारण

मुंबई तक

ADVERTISEMENT

भाजपला बहुमत मिळवण्यामध्ये अडचणी आहेत, असा आशुतोष यांचा अंदाज आहे.
राजकीय विश्लेषक आशुतोष लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल काय बोलले?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणूक निकाल २०२४ अंदाज

point

राजकीय विश्लेषक आशुतोष यांचा अंदाज काय?

point

लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी कशी असेल?

Ashutosh on Lok Sabha election results : लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी आलेल्या एक्झिट पोलने भाजपला तिसऱ्यांदा बहुमत मिळेल असे अंदाज मांडले आहेत. पण, पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आशुतोष यांनी भाजपला बहुमत मिळणे कठीण असल्याचे सांगितले. यामागची कारणेही त्यांनी सांगितली. (Political analyst Ashutosh predicts that the BJP will not get a majority in the Lok Sabha elections)

लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील?

या प्रश्नाला उत्तर देताना राजकीय विश्लेषक आशुतोष म्हणाले की, "जर मी भविष्यवाणी करणारा असतो, तर मी भविष्यात डोकावून बघू शकलो असतो की काय होणार आहे. हा, पण दोन-तीन गोष्टी मी जरूर सांगू शकतो. एक तर ही निवडणूक होण्याआधी असं म्हटलं जात होतं की, एकतर्फी होईल. भाजपसमोर कोणतेही आव्हान नाहीये. ३०० पेक्षा जास्त जागा मिळणार आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होणार आहेत."

हेही वाचा >> महायुतीला सर्वाधिक फटका मुंबईत, पश्चिम महाराष्ट्रात काय?

"यातील काही गोष्टी तर होणार नाहीत. एक ही निवडणूक मागील तीन महिन्यात जाऊन बघितली तर विशेषतः मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून पूर्णपणे बदलली आहे. आज मोठे आव्हान आहे. एक प्रकारे शंका आहे की, भाजप स्वबळावर बहुमत मिळवू शकेल की नाही?", असे आशुतोष यांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> 12 जागांवरील निकाल महाराष्ट्राला देणार धक्का! पाहा कोणते मतदारसंघ 

ते पुढे बोलताना म्हणाले की, "माझे असे मत आहे की भाजपला बहुमत मिळवण्यात अडचणी येतील. पण, सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल. मी ही शक्यता फेटाळत नाही की, मला असं वाटतं की भाजप मित्रपक्षांच्या मदतीने केंद्रात सरकार स्थापन करू शकते. नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात. जी हवा दिसत आहे, त्यावरून चांगली लढत होत आहे आणि भाजपसाठी अवघड आहे."

भाजपसाठी ही निवडणूक आव्हानात्मक का झाली?

या प्रश्नाला उत्तर देताना आशुतोष म्हणाले की, "दोन-तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक माणसाने दहा वर्ष सत्तेत राहिल्यानंतर विरोधी वातावरण तयार होते, याकडे दुर्लक्ष केले गेले. कारण सरकारविरोधात नाराजी तयार होते. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार हे महत्त्वाचे मुद्दे होते."

"राहुल गांधींची जी यात्रा होती, तिला कुणीही श्रेय दिले गेले नाही. न्याय यात्रा... मी असं म्हणत नाही की त्यामुळे सगळं वातावरण बदललं, पण ज्या नेत्याला पप्पू म्हटलं गेलं. तो कन्याकुमारीपासून कश्मीर पायी यात्रा करतो. लोकांनी ते बघितले. तेव्हापासून काँग्रेसची प्रतिमा बदलली."

"राहुल गांधींनी न्याय यात्रा केली, तेव्हाही लोकांना वाटलं की, या माणसामध्ये काहीतरी आहे. तिथून दृष्टिकोण बदलायला सुरूवात झाली. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे भाजप अतिआत्मविश्वासात गेली. नरेंद्र मोदी ओव्हर कॉन्फिडन्ड झाले. जेव्हा तुम्ही असे होता, त्यावेळी तुमच्याकडे प्लॅन बी नसतो", असे आशुतोष यांनी सांगितले. 

ADVERTISEMENT

"भाजपचा प्लॅन ए फेल गेला"

"प्लॅन ए फेल गेला. म्हणजे जेव्हा कळलं की, राम मंदिर मुद्दा चालत नाहीये. तेव्हा तुम्ही गॅरंटीचा मुद्दा आणला. तोही चालला नाही. मग तुम्ही हे उचला, ते उचला. असे झाले आणि मग या अडचणी वाढल्या. मूळ मुद्दा काय आहे की, १० दहा वर्षात कोणत्याही सरकार विरोधात नाराजी, मग कितीही शक्तिशाली पंतप्रधान असो... तो परिस्थिती तयार करतो. दहा वर्षात नाराजी तयार झाली", असे ते म्हणाले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> शरद पवार 'इतक्या' जागा जिंकणार? अजित पवारांना किती? पाहा यादी

"राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडी निर्माण झाली आणि तिने या नाराजीला हवा दिली. आणखी एक गोष्ट झाली. मोदींची ही मोठी चूक म्हणेल. मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर बोलायला सुरूवात केली. म्हणजे काँग्रेसचा जाहीरनामा ज्यावर चर्चाच होत नव्हती, तो केंद्रस्थानी आणला. त्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली की, त्यात काय आहे?", असे आशुतोष यांनी सांगितले. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT