Narendra Modi: "मी आनंदाची बातमी घेऊन महाराष्ट्रात आलोय...",ठाण्यात PM नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

PM Narendra Modi Latest News
PM Narendra Modi Latest New
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केला घणाघात

point

PM नरेंद्र मोदी ठाण्यातील लोकार्पण कार्यक्रमात काय म्हणाले?

point

"काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांचं एकच मिशन आहे"

PM Narendra Modi Speech : मी आनंदाची बातमी घेऊन महाराष्ट्रात आलो आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेत दर्जा दिला आहे. हा केवळ मराठी आणि महाराष्ट्राचाच सन्मान नाही आहे. हा त्या परंपरेचा सन्मान आहे, ज्याने देशाला ज्ञान,दर्शन, अधात्म आणि साहित्याची संस्कृती दिली आहे. देशात आणि महाराष्ट्रात मराठी बोलणाऱ्या सर्वांचं मी अभिनंदत करतो, असं  मोठं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असून ठाण्यातील विविध विकासकामांचे त्यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आलं. या लोकार्पण सोहळ्यात मोदींनी जनतेला संबोधीत करतानाच काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. (The Central Government has given the status of elite language to Marathi language)

ADVERTISEMENT

काँग्रेसवर टीका करत मोदी म्हणाले, काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांचं एकच मिशन आहे. समाजाला आणि लोकांना वेगळं करा आणि सत्तेवर कब्जा करा. आम्हाला आपल्या एकतेलाच ढाल बनवायचं आहे. आम्हाला लक्षात ठेवायचं, जर आपण वेगळे झालो, तर हे लोक आनंद साजरा करतील. आपल्याला काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे मनसुबे उधळून टाकायचे आहेत. जिथे जिथे काँग्रेस पावलं  टाकतं, तिथे भ्रष्टाचारच होतो, असं म्हणत नरेंद्र मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

हे ही वाचा >> Jayant Patil: 'दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खुर्ची लाडकी...', लाडकी बहीण योजनेबाबत जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

मोदी काँग्रेसवर टीका करत म्हणाले, यांनी देशाला गरिबीच्या गर्तेत ढकललं. त्यांनी महाराष्ट्राला उद्ध्वस्त केलं. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं. यांनी ज्या राज्यात सरकार स्थापन केलं, त्यांनाही उद्ध्वस्त केलं. काँग्रेसचे चेले आमच्या वक्फ बोर्डाच्या विधेयकाला विरोध करण्याचा पाप करत आहेत. हे सावकरांबद्दल अपशब्द बोलतात. त्यांचा अपमान करतात. तरीही काँग्रेसचे चेले त्यांच्या मागे उभे राहतात. आज काँग्रेस घोषणा करत आहे की, जम्मू काश्मीरमध्ये आर्टीकल 370 पुन्हा एकदा लागू करतील. आता काँग्रेसचे चेले गप्प बसले आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> NCP अजित पवार गटाचे नेते सचिन कुर्मीकर यांची हत्या, भायखळा परिसरात नेमकं काय घडलं? 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT