Raj Thackeray : भाजप नेत्यांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा मोठा निर्णय, डावखरेंची चिंता मिटली!

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

MNS Chief Raj Thackeray on his way to Delhi, may seek two Maharashtra seats from ruling alliance. (Source: File)
raj thackeray
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२४

point

अभिजीत पानसे यांची उमेदवारी मनसेकडून मागे

point

राज ठाकरे यांचा मोठा निर्णय

Vidhan Parishad Election 2024 : विधान परिषद निवडणुकीची समीकरणे बदलली आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवार मैदानात उतरवला होता. पण, अचानक आता ठाकरेंनी आपला निर्णय बदलला आहे. भाजप नेत्यांच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी उमेदवार मागे घेतला आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांची टेन्शन कमी झाले आहे. (Raj Thackeray withdraws candidacy of Abhijit panse from Vidhan parishad election)

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. हा पाठिंबा केवळ लोकसभा निवडणुकीपुरताच होता, असे स्पष्ट करत मनसेकडून विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आला होता. 

अभिजीत पानसे भरणार होते अर्ज

कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे हे उमेदवारी दाखल करणार होते. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्ण तयारी केली होती. शक्तिप्रदर्शन करत पानसे उमेदवारी अर्ज भरणार होते. पण, त्यापूर्वीच त्यांची उमेदवारी पक्षाकडून मागे घेण्यात आली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भाजप नेत्यांची भेट, राज ठाकरेंनी बदलला निर्णय

अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केल्यापासूनच अशी चर्चा होती की, राज ठाकरेंची भाजपकडून मनधरणी केली जाईल आणि ते उमेदवार मागे घेतील. चर्चेप्रमाणेच घडामोडी घडल्या आहेत.

हेही वाचा >> मोदींच्या सरकारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' खासदार होणार मंत्री? 

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. शुक्रवारी (७ जून) अभिजीत पानसे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. त्यापूर्वी सकाळीच भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे आणि आमदार प्रसाद लाड यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर मनसेकडून पानसे यांची उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा केली.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> अजित पवारांचा मतदारसंघच धोक्यात! बारामतीकरांचा 'मेसेज' काय?

कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेचा मतदार आहे. पानसे यांनी निवडणूक लढली असती, तर मतांमध्ये फूट पडली असती आणि थेट फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला झाला असता. पण, फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेत त्यांना उमेदवार मागे घेण्याची विनंती केली. ज्यांची ७ जून रोजी घोषणा करण्यात आली.

ADVERTISEMENT

"आजच्या या दिवशी राज साहेबांनी पाठिंबा दिला, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि अभिजीत पानसेही इथे आहेत. मनसेचे खुप खुप आभार मानतो. त्यांनी जो पाठिंबा दिला आहे, त्यामुळे विजय आमचा होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे ३ तारखेला भेटीला आले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला", असे आमदार प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीनंतर म्हणाले. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT