Mumbai Tak Chavadi : '...तर मंत्रिपदाचा राजीनामा देईन', रामदास आठवलेंचं मोठं विधान
Ramdas Athwale, Mumbai Tak Chavadi : मी मंत्रिपदाला चिकटलेलो आहे, अशाप्रकारची चर्चा लोकांमध्ये होत असते. पण जिकडे सत्ता असते तिकडेच आठवले असतात. पण जिकडे आठवले असतात तिकडेच सत्ता असते, असे आठवले यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
Ramdas Athwale, Mumbai Tak Chavadi : मुंबई Takच्या आजच्या चावडीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हजेरी लावली होती. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रामदास आठवले यांनी अनेक मुद्यावर दिलखुलास उत्तरे दिली होती. 'मंत्रिपद काय माझ्यासाठी फार मोठं नाही. समाजाचा ऐक्य होत असेल तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायलाही तयार असल्याची भूमिका रामदास आठवले यांनी चावडीवर मांडली. (ramdas athawale big statement on mumbai tak chavadi resign from the ministry lok sabha election 2024 mahayuti maharashtra politics)
ADVERTISEMENT
बहुजन विचारांचे नेते एकत्र येणार का असा सवाल आठवले यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, बहुजन समाजाचे एक्य झालंच पाहिजे, कारण आमची फार मोठी ताकद आहे. 1989 मध्ये आम्ही जेव्हा एकत्र आलेलो तेव्हा शिवाजी पार्कवर आमची फार मोठी सभा झाली होती. त्यावेळी आमचं ऐक्य झालं होत, पण कुणासोबत युती करायची या मुद्यावरून दोन-तीन महिन्यातच युती तुटली होती, असे आठवले यांनी सांगितले.
हे ही वाचा : ठाकरेंचा BJPला मोठा झटका! 'या' खासदाराचा प्रवेश ठरला
सगळे नेते एकत्र येत असतील तर माझी तयारी आहे. समाजाचा ऐक्य होत असेल तर माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची माझी तयारी आहे. मंत्रिपद काय माझ्यासाठी फार मोठं काम नाही. माझ्यातला कार्यकर्ता आणि पँथर अजून जिवंत आहे, असे देखील रामदास आठवले यांनी म्हटले आहे. तसेच मी मंत्रिपदाला चिकटलेलो आहे, अशाप्रकारची चर्चा लोकांमध्ये होत असते. पण जिकडे सत्ता असते तिकडेच आठवले असतात. पण जिकडे आठवले असतात तिकडेच सत्ता असते, असे आठवले यांनी सांगितले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा : VBA: तिसऱ्या यादीसोबत प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा, थेट बारामतीतच पवारांना...
जर प्रकाश आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली जर रिपब्लिकन पार्टीचे ऐक्य होत असेल तर माझी तयारी आहे. यात सगळ्या गटांनी ही सहभागी व्हावे असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. समाजाच ऐक्य झालं पाहिजे या मताचा मी आहे.ऐक्य होणे हे समाजाच्या फायद्याच आहे. ऐक्य करुन जर आम्ही एकत्रित काम केले तर आम्हाला सत्ता मिळणार आहे, असा विश्वास देखील आठवलेंनी यावेळी व्यक्त केला.
ADVERTISEMENT