Priyanka Chaturvedi : 'श्रीकांतच्या कपाळावर लिहलंय, माझा बाप गद्दार...'; चतुर्वेदींच्या टीकेने पेटला वाद
Priyanka Chaturvedi Criticize Eknath Shinde : गद्दार गद्दारच राहणार.एक सिनेमा आला होता दिवार. या सिनेमात अमिताभ बच्चन त्याच्या हातावरचा टँटू दाखवतो. यामध्ये मेरा बाप चोर है! असे लिहलेले असते. पण इथे श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहलंय, मेरा बाप गद्दार आहे! अशी बोचरी टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिदेंवर केली होती.
ADVERTISEMENT
Priyanka Chaturvedi Criticize Eknath Shinde : ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या एका वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. चतुर्वेदी यांनी 'श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहलंय, मेरा बाप गद्दार आहे' असे विधान करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर टीका केली होती. चतुर्वेदींच्या (priyanka chaturvedi) या टीकेनंतर आता मोठा वाद पेटला आहे. तसेच शिंदे गटाकडून देखील चर्तुर्वेदींना जोरदार प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. (thackeray mp priyanka chaturvedi criticize eknath shinde shrikant shinde sheetal mhatre reply north east mumbai constituency)
ADVERTISEMENT
मुंबईच्या घाटकोपर येथे महाविकास आघाडीतर्फे संजय दिना पाटील यांच्या निवडणूक प्रचाराची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेतून बोलताना प्रियंका चर्तुर्वेदी यांनी वादग्रस्त विधान केले. गद्दार गद्दारच राहणार.एक सिनेमा आला होता दिवार. या सिनेमात अमिताभ बच्चन त्याच्या हातावरचा टँटू दाखवतो. यामध्ये मेरा बाप चोर है! असे लिहलेले असते. पण इथे श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहलंय, मेरा बाप गद्दार आहे! अशी बोचरी टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिदेंवर केली होती.
हे ही वाचा : Pune Crime : WhatsApp आणि 900 अश्लील व्हिडिओ...,
दावोसला गुलाबी थंडीत काय केलंत?
शिंदेंवरील या टीकेचा समाचार आता शीतल म्हात्रे यांनी घेतला आहे. आपण कशी खासदारकी मिळवलीत आणि तुमचा काही संबंध नसताना दावोसला गुलाबी थंडीत काय केलंत? हे खरं तर तुम्ही लोकांना सांगितली पाहिजे, असे शीतल म्हात्रे म्हणाल्यात.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
खासदारकीची टर्म संपत आल्यानंतर आपली जी तडफड चालली आहे. ही आपल्या वक्यव्यातून दिसून येते आहे. आपल्याला परत खासदाराकी मिळावी यासाठी आपण कोणाला कोणाला भेटलात. माझ्याकडे आदित्यचे कसे कसे फोटोग्राफ आहेत ते दाखवून तरी मला खासदारकी द्या,असे सांगणाऱ्या तुम्ही कोणाला बोलताय तुम्ही याचा थोडा विचार करा भान ठेवा, असा सल्ला देखील शीतल म्हात्रेंनी प्रियंका चतुर्वेदीला दिला.
हे ही वाचा : अदाणी-अंबानीवरून मोदींना पवारांनी घेरलं, 'दोस्त तुमचे अन् काँग्रेसवर...'
ADVERTISEMENT