Maharashtra DCM:'या' 5 जणांपैकी कोण होऊ शकतं उपमुख्यमंत्री, फडणवीसांच्या दिल्लीत दौऱ्यात नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis and DCM Candidate: देवेंद्र फडणवीस यांनी जर उपमुख्यमंत्री पद सोडलं तर अशावेळी राज्यातील भाजपचे 5 असे नेते आहेत की ज्यांच्या नावाचा उपमुख्यमंत्री पदासाठी विचार केला जाऊ शकतो.
ADVERTISEMENT
Maharashtra DCM Candidate: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या दारूण पराभवनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. याबाबत त्यांनी काल (7 जून) गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा देखील केली. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या खराब कामगिरीनंतर फडणवीस यांनी आपले पद सोडून पक्षासाठी संपूर्ण वेळ द्यायचा असल्याचं म्हटलं आहे. (who among the 5 important leaders of bjp in maharashtra can become the deputy chief minister what exactly happened during devendra fadnavis visit to delhi)
ADVERTISEMENT
बुधवारी झालेल्या भाजप कोअर कमिटीच्या बैठकीनंतर फडणवीस यांनी या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारमधून आपल्याला मोकळं करण्यात यावं जेणेकरून पक्षासाठी पूर्ण वेळ काम करता येईल असं म्हटलं होतं. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी फडणवीसांनी पक्षाच्या शीर्ष नेत्याची भेटही घेतली.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह यांनी फडणवीस यांना महाराष्ट्र सरकारसाठी काम करत राहण्यास आणि राज्यात भाजपला पुनरुज्जीवित करण्यासाठी योजना तयार करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रात या वर्षी ऑक्टोबरच्या आसपास विधानसभा निवडणुका होऊ शकतात.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
"तुम्ही राजीनामा दिल्यास भाजप कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल. त्यामुळे आता राजीनामा देऊ नका," असं शहा फडणवीसांना म्हणाले. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याबाबत सविस्तर चर्चा करणार असल्याचे शहा म्हणाले. हा शपथविधी सोहळा रविवारी संध्याकाळी होणार आहे.
देवेंद्र फडणवीस हे राजीनामा देण्यावर ठाम?
दुसरीकडे अशीही चर्चा आहे की, राज्यात भाजपची जी दारुण परिस्थिती झाली ती गोष्ट फडणवीसांच्या अत्यंत जिव्हारी लागली असल्याने ते आपल्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
जर देवेंद्र फडणवीस हे आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि ते सरकारमधून बाहेर पडले तर अशावेळी भाजपमधील नेमकं कोण उपमुख्यमंत्री होणार याबाबतही आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
'या' पाच नेत्यांपैकी एक होणार महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री?
देवेंद्र फडणवीस यांनी जर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तर अशावेळी ते पद नेमकं कोणाला मिळणार याविषयी सध्या जी चर्चा सुरू आहे त्यामध्ये राज्यातील भाजपच्या पाच नेत्यांची नावं प्रचंड चर्चेत आहेत. यामध्ये सर्वात जोरदार चर्चा ही देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वात निकटचे समजले जाणारे गिरीश महाजन यांची आहे. पण कालच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या गोष्टींचं खंडन केलं आहे.
मात्र, असं असलं तरीही महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही कोणतेही बदल होऊ शकतात हे आपण मागील काही वर्षात पाहत आलोय. अशावेळी फडणवीसांऐवजी गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि रवींद्र चव्हाण यापैकी एका नेत्याला नक्कीच उपमुख्यमंत्री पदाची लॉटरी लागू शकते..
परंतु देवेंद्र फडणवीस हे आपला निर्णय नेमका कशा पद्धतीने पुढे नेतात आणि भाजपचे केंद्रीय नेते त्यावर काय कार्यवाही करतात यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मोठा झटका..
लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात केवळ 9 जागा जिंकता आल्या, 2019 मध्ये भाजपने महाराष्ट्रात तब्बल 23 जागा जिंकल्या होत्या. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर येण्यात यशस्वी होऊ शकतो. असा विश्वास फडणवीस यांच्या निकटवर्तीयांना आहे.
विनोद तावडेंना पुन्हा राज्यात आणणार?
दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत पोहोचण्यापूर्वी गुरुवारी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांची देखील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत एक बैठक झाली हे विशेष. या घडामोडीकडे पाहणं देखील महत्त्वाचे आहे कारण की, तावडे आणि फडणवीस यांच्यात सारं काही आलबेल नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तावडेंना तिकीट न देणं आणि नंतरच्या काळात त्यांना दिल्लीच्या राजकारणात पाठवणं या सगळ्या गोष्टींमुळे तावडे आणि फडणवीसांमध्ये काहीसं बिनलसं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अशावेळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी विनोद तावडे यांच्यासारख्या सर्वसमावेशक नेत्याला भाजपचं नेतृत्व पुन्हा महाराष्ट्रात पाठविण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुकीचा विचार करता भाजप तावडेंवर एखादी मोठी जबाबदारीही देऊ शकतं.
देवेंद्र फडणवीस-अमित शहा यांच्या भेटीत नेमकं घडलं?
उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी काल (7 जून) भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाह यांनी फडणवीस यांना महाराष्ट्र सरकारसाठी काम करत राहण्यास आणि राज्यात भाजपला पुनरुज्जीवित करण्यासाठी योजना तयार करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रात या वर्षी ऑक्टोबरच्या आसपास विधानसभा निवडणुका होऊ शकतात.
"तुम्ही राजीनामा दिल्यास भाजप कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल. त्यामुळे आता राजीनामा देऊ नका," असं शाहा हे फडणवीसांना म्हणाले असल्याचं समजतं आहे. नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आपण सविस्तर चर्चा करु असं शाहा फडणवीसांना म्हणाले.
ADVERTISEMENT