Chandrayan 3 Prakash Raj tweet : चांद्रयान-3 वर ‘चायवाला’च्या जोकमुळे ट्रोल झालेल्या प्रकाश राजने लँडिंगनंतर केलं ‘हे’ ट्वीट

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Actor Prakash Raj Chandrayaan 3 congratulatory tweet after successful campaign
Actor Prakash Raj Chandrayaan 3 congratulatory tweet after successful campaign
social share
google news

prakash raj chandrayan 3 tweet : चांद्रयान-3 मोहिम फत्ते झाल्यानंतर देशासह जगभरातून भारताचे कौतुक झाले. या कौतुकमध्ये भर टाकली ती अभिनेता प्रकाश राज यांनी म्हटले आहे की, या मोहिसाठी फक्त भारतच नाही तर मानवतेसाठीही खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे. त्याच बरोबर ज्यांनी ज्यांनी ही मोहिमे यशस्वी होण्यासाठी योगदान दिले आहे, त्या सर्वांचे आभारही मानले आहेत. चांद्रयान-3 मिशनवर या आधी ट्विट केल्यानंतर प्रकाश राज यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते.

ADVERTISEMENT

मानवतावतेसाठी मोठी गोष्ट

चंद्रावर विक्रम लँडरचे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर प्रकाश राज यांनी म्हटले आहे की, भारत आणि मानवतेसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच बरोबर इस्त्रो, चंद्रयान आणि विक्रम लँडरच्या यशस्वी योगदानासाठी ज्यांचे योगदान लाभले आहे. त्या सर्वांचे आभार. कारण आता या यशस्वी मोहिमेमुळे आपल्या सगळ्यांनाच ब्रह्मांड म्हणजे नेमकं काय, तिथं घडणाऱ्या महत्वाच्या घटना घडामोडी आपल्याला कळणार आहेत.

 

प्रकाश राज आणि टीका

प्रकाश राज यांनी सोमवारी चांद्रयान-3 बद्दल ट्विट करत 21 ऑगस्ट रोजी एक जोक करुन सोशल मीडियावर चर्चेला मोठे उधाण आणले होते. त्या त्यांच्या ट्विटमध्ये चहावाल्याचे एक कार्टून पोस्ट करत लिहिले होते की, चंद्रावर विक्रम लँडरने घेतलेले पहिले छायाचित्र. त्यांच्या या ट्विटमुळे त्यांना ट्रोलही करण्यात आले होते.

ADVERTISEMENT

वाचा : Wagner Chief vs Vladimir Putin: प्रिगोझिनला विमानतच संपवलं, पुतीन यांनी मित्र आणि शत्रूचा ‘असा’ काढला काटा!

चंद्रावर पोहचला चहावाला

अभिनेता प्रकाश राज यांच्या त्या चहावाल्याच्या ट्विटमुळे देशातील अनेक लोकांना नाराज केले. त्यांच्या त्या ट्विटमुळे चांद्रयान-3 मोहिमेचा अपमान झाल्याची प्रतिक्रियाही लोकांनी व्यक्त केली. त्यांच्या त्या ट्विटवरून भारताच्या महत्वाकांक्षी आणि जी यशस्वीतेच्या जवळ जाणाऱ्या मोहिमेचा प्रकाश राज अपमान करत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर अनेक नेटिजन्सकडून त्यांना अपशब्दही वापरले होते.

ADVERTISEMENT

 

तुम्ही थोडं प्रौढ व्हा…

ट्रोल झाल्यानंतर प्रकाश राज यांनी 21 ऑगस्ट रोजी ट्रोल्स करणाऱ्यांना उत्तर देताना त्यांनी म्हटले की, “द्वेषला द्वेषच दिसतो… मी आर्मस्ट्राँगच्या काळातील म्हणजेच खूप जुना,1969 मधील आमच्या केरळच्या चहा विक्रेत्याचा आनंद साजरा करत असलेल्या विनोदाचा संदर्भ दिला होता. मात्र ट्रोल्स करणाऱ्यांनी कोणता चहा विकणारा पाहिला आहे? जर तुमच्याकडे विनोद समजला नसेल तर. हा तुमचा स्वतःचा विनोद आहे. थोडं प्रौढ व्हा, असो टोलाही त्यांनी ट्रोल करणाऱ्यांना लगावला होता.

वाचा : Chandrayaan-3: भारताचं ‘प्रज्ञान’ जगाला चंद्राचं ‘ज्ञान’ देणार…; नेमकं काय-काय मिळणार?

प्रत्येक भारतीयाला अभिमान

चंचांद्रयान-3 च्या यशस्वी मोहिमेनंतर कलाकार, खेळाडूंसह सामान्य नागरिकांनही इस्त्रोचे अभिनंदन करत देशाचे कौतुक केले. सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षय कुमार या सगळ्यांनी या मोहिमेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी देशाला संबोधित केले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT