Munawar Faruqui: 'जिथे दिसेल तिथे चोपा'; कोकणी माणसांची खिल्ली उडवणाऱ्या मुनव्वरला धमकी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुनव्वर फारूकीचा नेमका वाद काय?

point

भाजप नेते नितेश राणे यांचाही चढला पारा

point

मुनव्वर फारुकीने मागितली माफी

Munawar Faruqui Controversy : बिग बॉस 18 चा विजेता आणि प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनावर फारुकी पुन्हा एकदा वादात सापडला आहे. मुनव्वर फारुकीवर महाराष्ट्रातील कोकणी समाजातील लोकांसाठी अपशब्द वापरल्याचा आरोप आहे, त्यामुळे कोकणी समाज मुनव्वर विरोधात आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. कॉमेडियनने त्याच्या अपमानास्पद भाषेबद्दल लवकरात लवकर माफी मागावी अन्यथा त्याला 'चोप मिळेल' असा इशारा देण्यात आला होता. या संपूर्ण वादानंतर आता मुनव्वरने अखेर आपली चूक झाल्याची कबुली देत माफी मागितली आहे. (munawar faruqui controversy he said bad word to kokani people now he apologises mla nitesh rane threatens to send him to pakistan)

ADVERTISEMENT

मुनव्वर फारूकीचा नेमका वाद काय?

स्टँडअप कॉमेडियन मुन्नवरने गेल्या आठवड्यात एक शो केला होता, ज्यामध्ये त्याने महाराष्ट्रातील कोकणी समाजावर भाष्य केले होते आणि अपशब्द वापरले होते. मुन्नावर म्हणाला होता, हे कोकणी लोक **** बनवतात. कोकणी समाजासाठी वापरण्यात येणाऱ्या मुनव्वरच्या या शब्दावरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे मुनव्वरवर कोकणी समाजातील लोक संतप्त झाले.

हेही वाचा : Maharashtra Weather: राज्यातील 'या' भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस! पहा हवामानाचा अंदाज

शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे नेते, आमदार आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर जे स्वत: नगरसेवक राहिलेले आहेत, त्यांनीही आक्रमक होत त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'जर ह्याने कोकणी माणसांची माफी नाही मागितली तर हा पाकिस्थान प्रेमी मुनावर जिथे दिसेल तिथे त्याला तुडवणार... कोकणी माणूस कसा तुडवतो हे याला समजू दे, याला जो तुडवेल त्याला एक लाखाचे बक्षीस... येवो कोकण आपलंच असा.'

हे वाचलं का?

भाजप नेते नितेश राणे यांचाही चढला पारा

भाजप नेते नितेश राणे हे ही मुनव्वर फारूकीवर संतापले. आक्रमक होत ते म्हणाले की, 'तुझ्यासारखा हिरवा साप पाकिस्तानात पाठवायला जास्त वेळ लागणार नाही. तो कोकणातील जनतेला शिव्या देत आहे. माफी न मागितल्यास आम्ही त्याला पाकिस्तानात पाठवण्यात वेळ घालवणार नाही. '

हेही वाचा : Chhagan Bhujbal मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटणार? भुजबळांनीच सुचवला पर्याय

मुनव्वर फारुकीने मागितली माफी

या संपूर्ण वादानंतर मुनव्वरने एक व्हिडीओ शेअर करत आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. मुनव्वर म्हणाला, 'काही दिवसांपूर्वी एक शो आला होता, ज्यामध्ये क्राउड वर्क होते. प्रेक्षकांशी संवाद साधला जात होता. त्या काळात कोकणाबद्दल चर्चा झाली, पण थोडा गैरसमज झाला. कोकणी समाजाबद्दल मी काहीतरी चुकीचे बोललो, त्यांची चेष्टा केली असे अनेकांना वाटते पण तसे नव्हते. कोणालाही दुखवण्याचा माझा हेतू नव्हता.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Devendra Fadnavis Mumbai tak Baithak 2024: पक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली तर पवार साहेबांना गोल्ड मेडल: फडणवीस

संवादादरम्यान माझ्या तोंडून ती गोष्ट निघाली. पण यामुळे अनेकांचे मन दुखावले. मी मनापासून याची माफी मागू इच्छितो. ज्याला वाईट वाटले त्याला क्षमस्व. त्या शोमध्येही सगळे होते. मराठी, हिंदू, मुस्लिम, सगळे लोक होते. पण जेव्हा अशा गोष्टी इंटरनेटवर येतात तेव्हा ते कळते. कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. जय हिंद...जय महाराष्ट्र.'

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT