Salman Khan Firing : सलमान खानच्या घरावर कुणी झाडल्या 5 गोळ्या?

मुंबई तक

ADVERTISEMENT

सलमान खानच्या घरावर दोन अज्ञातांनी गोळीबार केला.
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट या घरावर गोळीबार.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार

point

मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी केला गोळीबार

point

एक गोळी लागली खिडकीच्या जाळीला

Salman Khan House Firing : (देव कोटक, मुंबई) मुंबईतील सिनेसृष्टी रविवारी हादरली. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी घरावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी तीन राऊंड फायर केले. त्यानंतर दोघेही तेथून तत्काळ फरार झाले. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. पण, घटनेने सलमानच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. 

ADVERTISEMENT

पहाटे 4.50... दुचाकीवर आले अन् झाडल्या गोळ्या

सलमान खानच्या बंगल्याबाहेर गोळी कोणी चालवली हा अद्याप तपासाचा विषय आहे. दोन्ही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

या गोळीबारानंतर सलमान खानला असलेला धोका लक्षात घेऊन त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बिष्णोई टोळीने त्यांच्या बंगल्याची रेकीही केली होती. त्यामुळे सलमान खान कुणाच्या निशाण्यावर आहे. त्याला मारण्याचा प्रयत्न कोण करतंय? त्याला यापूर्वी कुणी धमक्या दिल्या होत्या... हेच जाणून घेऊयात.

हे वाचलं का?

सलमान बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर?

गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खानला बिश्नोई गँगपासून धोका आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि भारत आणि कॅनडातील वॉन्टेड गँगस्टर गोल्डी ब्रार यांनी सलमान खानला मारण्याची अनेकदा धमकी दिली आहे.

बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांनी अनेक वेळा मुंबईत सलमानवर हल्ला करण्यासाठी आपले शूटर पाठवले होते. लॉरेन्सचा खास गँगस्टर संपत नेहरा 2018 साली सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटला पुन्हा भेट देण्यासाठी आला होता.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> CM शिंदेंसाठी बॅड न्यूज, शिंदेंच्या कामकाजावर किती लोकं समाधानी? सर्व्हेतून मोठा खुलासा 

पण, हरयाणा पोलिसांनी हल्ला करण्यापूर्वी नेहराला अटक केली होती. चौकशीदरम्यान त्याने सलमान खानवरील हल्ल्याचा सगळा कट उघड केला होता.

ADVERTISEMENT

सलमान खानला बिश्नोई टोळीपासून धोका आहे, हे मुंबई पोलीस, दिल्ली पोलिसांसह जवळपास सर्व तपास यंत्रणांना माहीत आहे. बिश्नोई टोळीच्या धमकीमुळेच मुंबई पोलिसांनी सलमानला सुरक्षा दिलेली आहे. अभिनेता कुठेही गेला तरी त्याची सुरक्षा नेहमीच कडक असते.

पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा झाला होता प्रयत्न 

या वर्षी जानेवारी महिन्यात दोन जणांनी सलमानच्या पनवेल येथील फार्म हाऊसमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला होता. दोघेही तार तोडून आत शिरण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडले होते. दोघांकडे बनावट आधारकार्ड सापडले होते.

लॉरेन्स बिश्नोई का पडलाय सलमान खानच्या पाठीमागे?

सलमान आणि त्याला मिळणाऱ्या धमक्यांचा शेवट होताना दिसत नाहीये. धमक्यांचं हे सत्र 1998 पासून सुरू आहे. त्याच वर्षी काळवीट शिकार प्रकरणात अभिनेत्याचे नाव पुढे आले. तेव्हापासून बिश्नोई समाजातून सलमानला विरोध सुरू आहे.

हेही वाचा >> महाराष्ट्रात पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जिंकणार 'या' जागा, पाहा संपूर्ण यादी 

लॉरेन्सच्या मते, त्यांच्या समाजात प्राण्यांना, विशेषत: हरणांना देवाच्या समान मानले जाते. काळ्या हरणाची पूजा केली जाते. अशात काळवीट शिकार प्रकरणात सलमानचे नाव समोर येताच या गुंडाने सलमानला खुलेआम धमक्या देण्यास सुरुवात केली. त्या दिवसापासून सलमान त्यांच्या रडारवर आहे.

सलमानला पाठवले आहेत धमकीचे ई-मेल

गेल्या वर्षी 18 मार्च रोजी अभिनेत्याला धमकीचा ईमेल देखील आला होता. ज्यामध्ये गोल्डी ब्रारला सलमानशी समोरासमोर बोलायचे आहे, असे लिहिले होते. 

10 एप्रिल रोजी आणखी एक धमकीचा फोन आला. त्यात 30 एप्रिलला सलमानला संपवण्यात येणार असल्याचे म्हटले गेले होते.

हेही वाचा >> Lokniti-CSDS सर्व्हेमध्ये मोदी सरकारसाठी धोक्याची घंटा?, NDA की INDIA.. कोण जिंकणार? 

'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत गँगस्टर गोल्डी ब्रार म्हणाला होता की, "सलमान त्याचे टार्गेट आहे आणि जर त्याला संधी मिळाली तर तो अभिनेत्याला नक्कीच मारेल.'

या सर्व धमक्या लक्षात घेऊन सलमानला कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तो सुखरुप रहावा म्हणून त्याचे चाहते नेहमीच प्रार्थना करत असतात. अशातच सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्याने, त्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT