Janhavi Killekar : सगळ्यांनाच 'बुक्कीत टेंगुळ' देऊन जान्हवीने जिंकले 900000 रूपये!

मुंबई तक

ADVERTISEMENT

money briefcase leaves bigg boss marathi season 5 with briefcase money won 9 lakh rupees suraj chavan won 14 lakh price money and bigg boss trophy
जान्हवी ठरली शातीर खिलाडी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जान्हवीने मनी बॅग घेत स्पर्धेतून घेतली माघार

point

स्पर्धेतून माघार घेत 9 लाख कमावले

point

जान्हवीच्या शातीर खेळीचे होतेय कोतुक

Janhavi Killekar Leaves Money Briefcase : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनवर झापूक झुपूक करत सूरज चव्हाणने नाव कोरलं आहे. या विजयासह बिग बॉसने त्याला ट्रॉफी आणि 14 लाखाच बक्षीस दिलं आहे. यासह अनेक मोठ्या बक्षीसाचा वर्षाव सूरजवर झाला आहे. दरम्यान एकीकडे सूरजच्या विजयाची चर्चा सूरू असताना दुसरीकडे जान्हवीच्याही शातीर खेळीचे कौतुक केले आहे. कारण अंतिम टप्प्यात घेतलेल्या निर्णयामुळे जान्हवीच्या हाती मोठी रक्कम लागली आहे. जी इतर रनरअप सदस्यांच्या कैकपटीने जास्त आहे. त्यामुळे ऐनवेळी स्पर्धेतूम माघार घेऊन जान्हवीने किती लाख कमावले हे जाणून घेऊयात. (money briefcase leaves bigg boss marathi season 5 with briefcase money won 9 lakh rupees suraj chavan won 14 lakh price money and bigg boss trophy) 

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला होते. या ग्रँड फिनाले शर्यतीत सहा सदस्य होते. स्पर्धेच्या सुरुवातीला रितेश देशमुख यांनी सहा सदस्यांना अगोदर 7 लाखाची ऑफर दिली होती.यावेळी रितेशच्या हातात दोन बँगा होत्या. एका बँगेत 7 लाख रूपये होते, तर दुसऱ्या हातात सहाव्या सदस्याचे नाव होते. जो थेट घराबाहेर जाणार होता. खरं तर हा सदस्य कोण होता? हे कोणालाच माहिती नव्हते. पण नंतर रितेशने 2 लाखाची रक्कम आणखीण वाढवली. त्यानंतर जान्हवी किल्लेकर ही पुढे आली आणि तिने बझर दाबला. तिने हा बझर दाबून मास्टरस्ट्रोकच खेळला. कारण दुसऱ्या बँगेत एलिमिनेशन साठी तिचेच नाव आहे. 

हे ही वाचा : Suraj Chavan : 14 लाखांचा चेक, बाईक आणि...बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती लाख मिळाले?

जर तिने ही रक्कम स्विकारली नसती तर ती थेट एलिमिनेट झाली असती. आणि तिच्या हातात दमडी देखील आली नसती. खरं तर तिला कळून चुकलेलं की ती या स्पर्धेत विजेती होणे अशक्यच होतं. त्यामुळे योग्यवेळी योग्य निर्णय घेऊन जान्हवीने माघार घेण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे तिच्या हातात 9 लाखाची रक्कम लागली. जर तिने ही रक्कम स्विकारली नसती तर दुसऱ्याच क्षणी ती नॉमिनेट झाली असती. त्यामुळे जान्हवीने घेतलेला निर्णय मोठी शातीर खेळी मानली जात आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

खरं तर या स्पर्धेत जे खेळाडू रनरअप ठरले आहेत, त्याच्या वाट्याला फक्त 1 लाख रूपयेच आले आहे. जसे अभिजीत पहिला रनरअप, निक्की दुसरी रनरअप आणि डिपी दादा तिसरा रनरअप ठरला होता. या सदस्यांना फक्त प्रत्येकी 1 लाख मिळाले आहेत.त्या तुलनेच जान्हवीने एकटीने 9 लाख जिंकले आहेत. त्यामुळे इतर खेळाडूंच्या तुलनेत जान्हवी शातीर ठरली आहे. 

माघार घेतल्यानंतर जान्हवी काय बोलली? 

''मी उद्धट बोलले, मोठ्यांचा अपमान केला. मला माहितीये की, लोकांचा राग शांत झालेला नाहीये. हा गेम आहे आणि हा बिग बॉसने दिलेला एक टास्क आहे. टास्क पूर्ण नाही केला, तर बिग बॉस चिडतात. मी प्रायश्चित म्हणून हा बझर वाजवते आणि हा खेळ सोडते'', असे सांगत जान्हवीने 9 लाखांची पैशांची बॅग उचलून खेळातून माघार घेतली होती. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : झापूक झुपूक....सूरज चव्हाणने Bigg Boss Season 5 वर कोरलं नाव

    follow whatsapp

    ADVERTISEMENT