Pratyusha banerjee Suicide : “माझ्या मुलीने आत्महत्या केली नाही, तिची हत्या केलीये”

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Pratyusha Banerjee Suicide Case : टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. अलीकडेच सत्र न्यायालयाने प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुल सिंहची याचिका फेटाळून लावली. याचिका फेटाळताना न्यायालयाने प्रत्युषाला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात कुठेतरी त्याचा हात असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

ADVERTISEMENT

2016 मध्ये टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात तिचा प्रियकर राहुल राज सिंहवर तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप लावण्यात आला होता. अनेक दिवसांपासून या आरोपाला सामोरे जात असलेल्या राहुलने या आरोपातून मुक्तता करावी, अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयात केला होता. पण, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळलाच नाही, तर त्यावर गंभीर भाष्यही केले आणि राहुलमुळेच प्रत्युषाने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा >> Amravati crime : दिवाण बेडमधून पडत होतं रक्त, आतमध्ये सापडले मायलेकाचे मृतदेह

राहुलने प्रत्युषाचे आयुष्य नरक बनवल्याचेही बोलले जात होते. आता याच विषयावर प्रत्युषाच्या वडिलांनी आजतक ला दिलेल्या मुलाखतीत काही महत्त्वाच्या गोष्टी उघड केल्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आठ वर्षे प्रतीक्षा

प्रत्युषा बॅनर्जीचे वडील शंकर बॅनर्जी म्हणतात, ‘आमच्या व्यवस्थेबद्दल काय सांगू, हे प्रकरण सुरू व्हायला 8 वर्षे लागली. बघा, ही आत्महत्या नसून हत्या आहे, अशी ओरड आम्ही आधीपासून करत आहोत. यामागे अनेक कारणे आहेत, जी हा खून असल्याचे सांगतात. आता एक एक करून सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि सर्वांसमोर येतील. न्यायालय कुणाचे नाही, तिथून सर्व सत्य बाहेर येते. प्रत्येक सत्य बाहेर येईल. मला आणि माझ्या पत्नीला माहित आहे की या आठ वर्षांत आम्ही काय केले आहे. हेच आमच्या जीवनाचे एकमेव ध्येय बनले होते.

आम्हालाच खलनायक बनवले

शंकर बॅनर्जी पुढे म्हणाले, ‘फेक मीडिया ट्रायल घेण्यात आली. गोष्टींना इतके ट्विस्ट केले गेले की आम्हाला खलनायक ठरवले गेले. त्यामुळे आम्ही आत्मविश्वास गमावून बसायचो. पण आता आमच्याही आशा पल्लवित झाल्या. मात्र, खटल्याचा निकाल आल्याने हळूहळू माझ्या मुलीची हत्या याच मुलाने केल्याचे सिद्ध होईल, असा विश्वास निर्माण झाला आहे. यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. उलट मी सर्व काही गमावले आहे. मी फक्त माझ्या मुलीच्या आणि त्या सर्व मुलींच्या हक्कासाठी लढत आहे.’

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Maratha Morcha: ‘ते कर्तबगार गृहमंत्री होते..’ शरद पवारांनी ‘असे’ टोचले देवेंद्र फडणवीसांचे कान

आम्ही सर्व काही गमावले

शंकर म्हणतात, ‘कधीकधी मला प्रश्न पडतो की मी असे काय केले होते की मला या सर्व गोष्टींमधून जावे लागतेय. मी माझा एकुलता एक मुलगा देखील गमावला आहे. वरून व्यवस्थेची अवस्था पहा की आजपर्यंत न्यायासाठी भटकावं लागत आहे. जितकं कमावलं होतं ते सर्व यात खर्ची केले. आता मी कोलमडून पडण्याचा धोका पत्करू शकत नाही. आता तिला न्याय मिळावा एवढीच माझी इच्छा आहे. अजून बरेच काही उघड व्हायचे आहे. आता बरेच सत्य बाहेर येणार आहे. माझी मुलगी आणि माझे कुटुंब मूर्ख होते, जे त्याच्या बोलण्याला बळी पडले. माझ्या वाट्याला जे दुःख आले, ते कोणत्याही मुलीच्या बापाच्या वाट्याला येऊ नये, असे मला वाटत’, शंकर बॅनर्जी म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT