Mamta Kulkarni: बोल्ड सीनचा धुरळा उडवणारी ममता कुलकर्णी बनली संन्यासी, किन्नर आखाड्याची...

मुंबई तक

महाकुंभ २०२५: अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर बनण्याचा निर्णय घेतला असून तिने आता संन्यासी जीवन स्वीकारलं आहे.

ADVERTISEMENT

ममता कुलकर्णी बनली संन्यासी
ममता कुलकर्णी बनली संन्यासी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अभिनेत्री ममता कुलकर्णीने घेतला मोठा निर्णय

point

ममता कुलकर्णी हिने घेतला संन्यास

point

किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली ममता कुलकर्णी

प्रयागराज: बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवणारी आणि अत्यंत ग्लॅमरस समजली जाणारी  अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने आता चक्क संन्यास घेतला आहे. ती आज (24 जानेवारी) किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बनणार आहे. आज संध्याकाळी, ममता संगम येथे पिंडदान सादर करणार आहे. त्याच वेळी, तिचा पट्टाभिषेक समारंभ किन्नर आखाड्यात होणार आहे. ममताने किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी महाराज आणि जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी जय अंबानंद गिरी यांचीही भेट घेतली. या बैठकीचे फोटोही समोर आले आहेत.

24 वर्षांनी ममता आली भारतात

अभिनेत्री ममता कुलकर्णी 24 वर्षांनी भारतात परतली आहे. डिसेंबर 2024 मध्ये ममता मुंबई विमानतळावर दिसली होती. इतक्या वर्षांनी तिला भारतात पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलेलं. ममता कुलकर्णी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी किंवा बिग बॉस 18 मध्ये प्रवेश करण्यासाठी भारतात आल्याचे बोललं जात होतं. पण, हे सर्व अंदाज चुकवत ममताने थेट संन्यासी होण्याचाच निर्णय घेतला आहे. आता ती थेट महाकुंभ 2025 चा भाग बनली आहे.

हे ही वाचा>> Janhvi Kapoor: बाई... जान्हवीने फ्लाँट केली फिगर, तुम्हीही म्हणाल हिचा तर कहर!

2000 साली ममता कुलकर्णीने मुंबई आणि भारताचा निरोप घेतला होता. मात्र, आता भारतात परतल्यानंतर, तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये तिने भारतीय भूमीवर पाऊल ठेवल्याबद्दल आनंद व्यक्त केला. 'सर्वांना नमस्कार, मी ममता कुलकर्णी आहे आणि मी 25 वर्षांनी भारतात, मुंबईला, , आमची मुंबईला परतली आहे.' मी 2000 मध्ये भारत सोडला आणि 2024 मध्ये परतलो. मी इथे आहे आणि मी खूप भावनिक होत आहे. हे कसे व्यक्त करावे हे मला समजत नाही.'

ती असेही म्हणालेली की, 'मी भावनिक होत आहे. जेव्हा विमान उतरले, खरं तर उतरण्यापूर्वीच, मी माझ्या उजवीकडे आणि डावीकडे पाहू लागले. मी 24 वर्षांनंतर माझा देश पाहत होते आणि मी भावनिक झाले. माझ्या डोळ्यात अश्रू होते. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर पडताच मी पुन्हा भावनिक झाले.'

हे ही वाचा>> Bipasha Basu: किनाऱ्यावरच सुरू झाली अभिनेत्री, रोमान्स अन्...

ममता कुलकर्णी ही 'करण अर्जुन', 'छुपा रुस्तम', 'बाजी' आणि इतर चित्रपटांसाठी ओळखली जातात. 2016 मध्ये, एका मोठ्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्रीचे नाव समोर आले होते. ड्रग्ज प्रकरणात दुबई तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या विकी गोस्वामीसोबतही ममता कुलकर्णीचे नाव जोडले गेले होते. भारतात परतल्यानंतर, अभिनेत्रीने या नात्याला नकार दिला आहे. ती म्हणते की ती आध्यात्मिक मार्गाचे अनुसरण करत आहे.

अत्यंत ग्लॅमरस अभिनेत्री होती ममता कुलकर्णी

ममता कुलकर्णी ही अत्यंत ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक होती. तिने अनेक सिनेमांमध्ये बोल्ड सीनही दिले होते. पण अचानक तिने बॉलिवूडला अलविदा केला होता. त्यानंतर ती अनेक वर्ष कॅमेऱ्यासमोर आलीच नव्हती. त्यामुळे तिच्या चाहत्यांचा बराच हिरमोड झाला होता. 

मात्र, आता भारतात परतत ममताने थेट संन्यासी होण्याचा निर्णय घेतला आहे. तिने हा निर्णय नेमका का घेतला याचं कारण मात्र, अद्याप समजू शकलेलं नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp